Goa Fish Price Dainik GOmantak
गोवा

Goa Fish Rates: गोव्यात माशांचे दर भिडले गगनाला! मार्केटमध्‍ये खरेदीसाठी गर्दी; वेंगुर्ला, मालवण येथूनही आवक

Goa Fish Price: म्‍हापसा मासळी मार्केटमध्‍ये बार्देश तालुक्‍याबरोबरच वेंगुर्ला, मालवण व इतर ठिकाणांहून मासे येतात. सिंधुदुर्गातून येणाऱ्या मासळीला मोठी मागणी असते.

Sameer Panditrao

बार्देश: खोल समुद्रातील मासेमारीला सध्‍या बंदी असल्‍यामुळे गावठी मासळीचे दर गगगनाला भिडले आहेत. तरीसुद्धा मागणी कमी झालेली नाही. कारण मत्‍स्‍यप्रिय गोमंतकीयांच्‍या आहारातील मासे हा एक प्रमुख घटक आहे.

म्‍हापसा मासळी मार्केटमध्‍ये बार्देश तालुक्‍याबरोबरच वेंगुर्ला, मालवण व इतर ठिकाणांहून मासे येतात. सिंधुदुर्गातून येणाऱ्या मासळीला मोठी मागणी असते. कारण ती ताजी, टवटवीत असते. आज रविवारी तर या मासळी मार्केटमध्ये एवढी गर्दी होती की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्‍हती. शेवटे , मुडदशे, सुंगटे, कुर्ल्या, काळंदुरे, लॅपो या मासळीला भाव जास्‍त मिळतो.

मासे कापणाऱ्यांची ‘चांदी’

दरम्‍यान, पूर्वी मासे घरी आणून कापले जात. पण आता काळ बदलला आहे. त्‍यामुळे बाहेरून मासे कापूनच घरात आणले जातात. म्हापसा मासळी मार्केटमध्‍ये परराज्यांतील लोक मासे कापून देतात.

मात्र पैसेही ते तसेच आकारतात. दिवसाकाठी हजारो रुपयांची मिळकत करतात. त्‍यांना सवडच नसते. अगोदर २० रुपये घेतले जायचे. पण आता ५० रुपये आकारले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT