Goa Fishing: एलईडी ट्रॉलरविरोधात मच्छीमार आक्रमक! संशयावरून होतेय कारवाई; वास्को, मालीमच्या बोटींना लक्ष्य

LED fishing trawlers: फिलिप डिसोझा म्हणाले, मच्छीमारांना एलईडी वापरत असल्याचा संशय ठेवून नोटिसा पाठवल्या गेल्या, परंतु त्या नोटिसांवर कोणाचीही स्वाक्षरी नाही.
Goa LED fishing issue
Goa Fishing NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात एलईडी लाईट परशिनर ट्रॉलरविरोधात स्थानिक मच्छीमारांचा संघर्ष आता तीव्र होत आहे. गोव्यातील विविध मच्छीमार प्रतिनिधींनी मत्स्यव्यवसाय संचालनालयात सोमवारी भेट देत स्थानिक मच्छीमारांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. स्थानिक मच्छीमारांना एलईडी वापरल्याच्या संशयावरून नोटिसा पाठवून त्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

फिलिप डिसोझा म्हणाले, मच्छीमारांना एलईडी वापरत असल्याचा संशय ठेवून नोटिसा पाठवल्या गेल्या, परंतु त्या नोटिसांवर कोणाचीही स्वाक्षरी नाही. मी जेव्हा विचारणा केली की लहान बोटींना नोटीस का पाठवली, तेव्हा संचालकांनी सांगितले की केवळ संशयावरून ही कारवाई झाली. वास्को आणि मालीम भागातील बोटींना यामध्ये लक्ष्य करण्यात आले आहे.

Goa LED fishing issue
Goa Fishing: होड्या, ट्रॉलर किनाऱ्यावरती! 1 जूनपूर्वीच मच्छीमारांनी गाशा गुंडाळला; मान्सूनपूर्व पावसाचा फटका

एलईडीचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या ६०० हून अधिक ट्रॉलरविरोधात कोणतीही ठोस कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न प्रसंगी मश्चिमरानी उपस्थित केला. जो नियम तोडतो, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. आम्ही स्थानिक असून आमच्यावर संशय घेतला जातो, ही शोकांतिका आहे.

Goa LED fishing issue
Goa Monsoon: पणजीत 5 दिवसांनंतर सूर्यदर्शन! पावसाचा जोर मंदावला; ‘ऑरेंज अलर्ट’ कायम

अनुदानाकडे दुर्लक्ष!

सरकारकडून अनुदान देण्याचे आश्वासन वारंवार दिले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच दिले जात नाही. न्यायालयाने आदेश दिला असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. या अन्यायामुळे अनेक मच्छीमार आता बोटी विकण्याचा विचार करत आहेत. एलईडी विरोधात आमचा लढा न्याय्य आहे. सरकारने चौकशीची पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी देखील मच्छीमारांनी मत्स्य संचालनालयाकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com