Indian Super League Football Dainik Gomantak
गोवा

Indian Super League Football: घरच्या मैदानावर एफसी गोवा वरचढ; सात सामने अपराजित राहण्याचा साधला पराक्रम

Indian Super League Football Tournament- मातब्बर मुंबई सिटीविरुद्ध फातोर्डा येथे लढत

किशोर पेटकर

Indian Super League Football Tournament एफसी गोवा संघाने मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत स्वप्नवत वाटचाल राखताना सात सामने अपराजित राहण्याचा पराक्रम साधला आहे.

त्यापैकी चार सामन्यात घरच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः वरचढ ठरताना सर्व लढती जिंकल्या आहेत. हीच मालिका मंगळवारी (ता. 12) मुंबई सिटी एफसीविरुद्ध कायम राखण्यासाठी यजमान संघ प्रयत्नशील असेल.

एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. सध्या सात लढतीतून सहा विजय व एक बरोबरी या अपराजित कामगिरीसह एफसी गोवा संघ 19 गुणांसह अव्वल स्थानी आहे.

मुंबई सिटी आता नवा प्रशिक्षक पेत्र क्रॅटकी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असून ते सुद्धा अपराजित आहेत. सहा सामन्यांतून चार विजय व दोन बरोबरींसह त्यांनी 14 गुणांची कमाई केली आहे.

त्यांनी मागील लढतीत बंगळूर एफसीचा 4-0 फऱकाने धुव्वा उडविला होता, त्यामुळे मुंबईच्या या तुल्यबळ संघाविरुद्ध एफसी गोवा संघाला निश्चिंत राहून नक्कीच चालणार नाही.

भक्कम खेळाचे प्रदर्शन

एफसी गोवा संघाने यावेळच्या आयएसएल स्पर्धेत भक्कम खेळाचे प्रदर्शन घडविले आहे. विशेषतः बचावफळीत ते प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरले आहेत. मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत फक्त तीन गोल स्वीकारले आहेत.

यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते. संदेश झिंगनमुळे एफसी गोवाचा बचाव मजबूत बनला असून नवा खेळाडू जय गुप्ता याचे अष्टपैलूत्व निर्णायक ठरले आहे.

यंदा एफसी गोवाने फातोर्ड्यात चारही सामने जिंकताना 12 गुण प्राप्त केले आहे. ही सुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाब आहे. गोलरक्षक अर्शदीप सिंग याने पाच लढतीत क्लीन शीट राखण्याचा पराक्रम केला आहे.

आकडेवारीत...

- एकूण सामने: 22, मुंबई सिटी विजयी: 10, एफसी गोवा विजयी: 7, बरोबरी: 5

- स्पर्धेतील गोलफरक: एफसी गोवा +8, मुंबई सिटी +7

- स्पर्धेत मुंबई सिटीचे 13, तर एफसी गोवा 11 गोल

“आम्ही मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सामना जिंकण्यासाठीच आमचे प्रयत्न असतील. पुढील दोन सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यावरून एफसी गोवा संघ मोसमात कुठे असेल याची प्रचिती येईल.”
-मानोलो मार्केझ, प्रशिक्षक एफसी गोवा
“एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यासाठी मी उत्सुक आहे. प्रतिस्पर्धी अव्वल संघ असल्याने त्यांच्याविरुद्धच्या सामन्याबद्दल आम्ही नियोजन केले आहे. एका सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध आम्ही कुठे आहोत हे पाहण्याचे औत्सुक्य आहे.”
-पेत्र क्रॅटकी, प्रशिक्षक मुंबई सिटी एफसी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT