मयेतील गणेश विसर्जन स्थळाचे उदघाटन करताना आमदार झांट्ये (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: मयेतील 2 गणेश विसर्जन स्थळांचे आमदार झांट्ये यांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा पंचायत निधीतून चोडण आणि पिळगाव येथे गणेश विसर्जन स्थळे उभारली (Goa)

Dainik Gomantak

Goa: जिल्हा पंचायत निधीतून मये मतदारसंघातील (Mayem Constituency ) चोडण आणि पिळगाव येथे दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन स्थळांचे (Ganesha immersion Spot) काम पूर्ण झाले आहे. बुधवारी दोन्ही ठिकाणी आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमात आमदार प्रवीण झांट्ये (MLA Pravin Zatye) यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले. कारभाट-चोडण येथे गणेश विसर्जन शेडच्या उदघाटन सोहळ्यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर (ZP President Kartik Kudnekar), जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच कमलाकांत वाडयेकर, उपसरपंच बबिता कळंगुटकर, पंच दिक्षा कुंडईकर आणि अन्य उपस्थित होते.

बागवाडा-पिळगाव येथील कार्यक्रमावेळी आमदारांसमवेत जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, पिळगावची उपसरपंच सौ. उर्मिला परबगावकर, स्थानिक पंच संदीप सालेलकर, अभियंते राजेश दळवी आदी उपस्थित होते. गावच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन आमदार झांट्ये यांनी केले. चतुर्थीपुर्वी गणपती विसर्जन स्थळाचे काम करण्यात आल्याने स्थानिक गणेशभक्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT