Fight Against Covid - 19: हिंदुस्तान कोका-कोला आणि इंडियन रेड क्रॉस तर्फे चिखली उपजिल्हा रुग्णालयाला उपकरणे

मार्मुगाव तालुक्याला कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत मदत (Fight Against Covid - 19)
हिंदुस्तान कोका-कोला आणि इंडियन रेड क्रॉस तर्फे चिखली उपजिल्हा रुग्णालयाला उपकरणे (Fight Against Covid - 19)
हिंदुस्तान कोका-कोला आणि इंडियन रेड क्रॉस तर्फे चिखली उपजिल्हा रुग्णालयाला उपकरणे (Fight Against Covid - 19)Dainik Gomantak
Published on
Updated on

Fight Against Covid - 19: हिंदुस्तान कोका-कोला (Hindustan Coca cola) बेव्हरेजेस आणि इंडियन रेड क्रॉस (Indian Red Cross) सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मार्मुगाव तालुक्याला कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात (Chikalim Sub District Hospital) जीवनावश्यक उपकरणे पुरवली. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) द्वारे दिलेली उपकरणे उपजिल्हा रुग्णालय, चिकलिम, वास्को येथे ऑपरेशन थिएटरची क्षमता वाढवण्यासाठी वापरली जातील.

चिखली उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात श्री अभिषेक मिश्रा, (फॅक्टरी मॅनेजर, एचसीसीबी गोवा),इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा राज्य अध्यक्ष श्री गौरीश एम. धोंड,शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, चिकलीम डॉ.अनिल उम्रसकर, इंडीयन रेड क्रॉस सोसायटीच्या मुरगाव तालुका अध्यक्ष फियोला रेगो, तसेच चंद्रकांत गवस उपस्थित होते.तसेच कृष्णा साळकर,शमी साळकर, डॉक्टर्स व नर्सेस उपस्थित होत्या.

चिखली उपजिल्हा रुग्णालयास पुरविल्या गेलेल्या उपकरणा विषयी बोलताना उपस्थित मान्यवर.
चिखली उपजिल्हा रुग्णालयास पुरविल्या गेलेल्या उपकरणा विषयी बोलताना उपस्थित मान्यवर.Dainik Gomantk

आतापर्यंत एचसीसीबी ने वर्णा इंडस्ट्रियल असोसिएशन द्वारे स्थापन केलेल्या कोविड केअर सुविधासाठी ५ ऑक्सिजन कन्सेंट्रेटर, १०० बेड आणि पीपीई किट, ऑक्सिमीटर, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर्स आणि शीतपेये दान केले आहेत. कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याकरिता गोव्याच्या स्थानिक समुदायाला तयार करण्यात मदत करण्यासाठी भारतातील उत्कृष्ट फास्ट मूव्हिंग कझ्युमर गुड्स कंपन्यांपैकी एक हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) ने चिकलिम हॉस्पिटलला जीवनावश्यक उपकरणे दान केले आहेत. हे जीवनावश्यक उपकरणे शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, चिकलीम डॉ. उम्रसकर यांना वरील मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

एचसीसीबीने इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या भागीदारीत दान केलेले हे उपकरण मार्मुगाव तालुक्यासाठी एक महत्वाची संपत्ती आहे, कारण ह्या रुग्णालयात दाबोलिम, बोगमालो, सांकवाळ, सडा, न्यू वाडे आणि वर्णा इंडस्ट्रियल इस्टेट च्या बऱ्याच ग्रामीण भागातले लोकांची गरज पुरवते.योग्य उपचाराच्या सुविधेअभावी कोविड महामारी च्या दुसऱ्या लाटेदरम्यान या भागावर बराच गंभीर परिणाम झाला होता. तालुक्यातील लोकांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोलिम किंवा दक्षिण जिल्हा रुग्णालय यांसारख्या रुग्णालयात उपचारासाठी दूरवर जावे लागले. एचसीसीबी द्वारे प्रदान केलेल्या उपकरणांमुळे स्थानिक समाजातील लोक रुग्णालयात मोफत उपचार सुविधा घेऊ शकतील.

चिखली उपजिल्हा रुग्णालयास पुरविल्या गेलेल्या उपकरणा समवेत उपस्थित मान्यवर.
चिखली उपजिल्हा रुग्णालयास पुरविल्या गेलेल्या उपकरणा समवेत उपस्थित मान्यवर.Dainik Gomantk

एचसीसीबी ने गोवा राज्यासाठी आजपर्यंत जर्मनीमधून आयात केलेले ५ एव्हरफ्लो ऑक्सिजन कन्सेंट्रेटर्स दान केले आहेत. वर्णा इंडस्ट्रियल असोसिएशन ने स्थापित केलेल्या कोविडकेअर सुविधेला १०० बेड देखील प्रदान केले आहेत. याशिवाय, एचसीसीबी ने पीपीई किट, ऑक्सिमीटर, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सैनिटायझर्सचे वितरण सुद्धा केले आहेत आणि फ्रंटलाईन योद्धांच्या शीतपेय गरजा सुद्धा पूर्ण केल्या आहेत.

फॅक्टरी मॅनेजर, एचसीसीबीचे श्री अभिषेक मिश्रा, म्हणाले कि, एचसीसीबी"एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी असून, महामारीच्या विरुद्ध योगदान देणे आमचे कर्तव्य आहे असे आम्हाला वाटते. आम्हाला आशा आहे की आम्ही चिकलिम सिव्हिल हॉस्पिटलला दान केलेली उपकरणे आणि शीतपेये स्थानिक समुदायाला कोविड 19 विरुद्धच्या लढाईमध्ये मदत करतील आणि मौल्यवान मानवी जीव वाचवण्यात मदत होईल. येणाऱ्या काळात सुद्धा देशाला आम्ही आमचा पाठिंबा कायम देऊ. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा अध्यक्ष" श्री गौरीश एम. धोंड म्हणाले की, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा शाखेसाठी मानवतेच्या सेवेकरिता एचसीसीबीशी संलग्न होणे हा अभिमानाचा क्षण आहे. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे कि कोविड च्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे नवीन जीवनावश्यक उपकरणे रुग्णालयाला मार्मुगाव तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यास सक्षम करतील."

हिंदुस्तान कोका-कोला आणि इंडियन रेड क्रॉस तर्फे चिखली उपजिल्हा रुग्णालयाला उपकरणे (Fight Against Covid - 19)
Goa Covid -19: आज कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू, तर 86 नवे रुग्ण आढळले

एचसीसीबी नि आपल्या देशव्यापी कोविड मदतीच्या प्रयत्नांतर्गत देशातील अनेक रुग्णालयांना व्हेंटिलेटर, आईसीयू बेड, आईसीयू उपकरणे, BIPAP मशीन आणि इतर अनेक वैद्यकीय आपत्कालीन सुविधा दान केले आहेत. देशभरात ८ ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कंपनीची योजना आहे.असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गवस यांनी तर आभारप्रदर्शन फियोला रेगो यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com