Police Suspension  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: अब तक १०४! साडेचार वर्षांत निलंबित पोलिसांची आकडेवारी; ही आहेत कारणे

Police Suspension : या पोलिसांविरुद्ध कारवाई होते. मात्र, मागील दाराने त्यांना सेवेत दाखल करून घेतले जाते. गेल्या साडेचार वर्षांत खात्यातील १०४ पोलिस विविध आरोपाखाली तसेच गुन्ह्यांमुळे निलंबित झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : पणजी पोलिस खात्याची प्रतिमा ही काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या गैरकृत्यामुळे तसेच खंडणीवसुली प्रकरणामुळे मलिन झाली आहे.

हल्लीच पोलिस अधीक्षकांनी खात्यात दारू व ड्रग्ज सेवन करणारे तसेच जुगारी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे शिस्तबद्ध असलेल्या खात्याच्या काही कर्मचाऱ्यांनी बेशिस्तपणाचा कळस गाठला आहे.

या पोलिसांविरुद्ध कारवाई होते. मात्र, मागील दाराने त्यांना सेवेत दाखल करून घेतले जाते. गेल्या साडेचार वर्षांत खात्यातील १०४ पोलिस विविध आरोपाखाली तसेच गुन्ह्यांमुळे निलंबित झाले आहेत. त्यातील ८५ जण सेवेत पुन्हा रूजू झाले आहेत. उर्वरित २९ जणांचे निलंबन असले, तरी ५० हून अधिकजणांविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे.

हल्लीच एका हीट अँड रन प्रकरणामध्ये फोंड्याचे तीन पोलिस कर्मचारी निलंबित झाले आहेत. पेडणे येथे पॅराग्लायडर व्यवसाय समुद्रकिनाऱ्यावर सुरू राहण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

पोलिस संरक्षणातून कैद्याच्या पलायनप्रकरणी तसेच ड्युटीवर असताना गैरहजर राहणे तसेच खात्याची परवानगी न घेता ट्रव्हल्सचा व्यवसाय करणे, कारवाई करण्यामध्ये निष्काळजीपणा करणे, खंडणी वसुली, लैंगिक अत्याचार अशा अनेक विविध प्रकरणी ही निलंबनाची कारवाई झाली आहे. हे निलंबन अनेकदा एका महिन्यात मागे घेतले जाते.

खात्यांतर्गत चौकशीला विलंब

ज्या पोलिसांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली जाते, त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाते. या चौकशीचा अहवाल निलंबन फेरआढावा समितीकडे पाठवला जातो. समितीवर पोलिस महासंचालक हे अध्यक्ष असतात.

अहवालात केलेल्या शिफारशीनुसार संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई किंवा निर्दोष ठरवण्याचा निर्णय घेण्यात येतो. खात्यांतर्गत चौकशी अनेक वर्षे प्रलंबित राहते. त्यामुळे ठेवण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होत नाही. ज्या अधिकाऱ्याला ही चौकशी दिली जाते तो अनेकदा इतर कामांमध्ये व्यस्त राहिल्याने चौकशीलाही वेळ लागतो, अशी माहिती पोलिस सुत्राने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT