पणजी: दीर्घ कालावधीनंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने रणजी-सीनियर संघ प्रशिक्षकपदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडूची निवड केली आहे. संघटनेने २०२४-२५ मोसमासाठी ५७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले पंजाबचे दिनेश मोंगिया यांची नियुक्ती केली.
गोव्याचे नवे प्रशिक्षक दिनेश मोंगिया ४७ वर्षांचे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलेले ते गेल्या १७ वर्षांतील गोव्याचे चौथे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे आता रणजी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आंतरराष्ट्रीय अनुभव येत आहे.
यापूर्वी, भारताचे माजी कसोटीपटू दोड्डा गणेश व ह्रषीकेश कानिटकर, तसेच श्रीलंकेचे माजी वेगवान कसोटी गोलंदाज नुवान झोयसा यांचा कार्यकाळ उल्लेखनीय ठरला.
कर्नाटकचे माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश २००७-०८, २००८-०९, २०१२-१३ व २०१९-२० असे चार मोसम गोव्याचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २०१९-२० मोसमात प्लेटमधून एलिट श्रेणीसाठी पात्रता मिळविली होती.
नुवान झोयसा २०१३-१४ व २०१४-१५ या दोन मोसमात मार्गदर्शक होते, तर महाराष्ट्राच्या ह्रषीकेश कानिटकर यांनी राष्ट्रीय पातळीवर सीनियर संघाचे प्रशिक्षक नात्याने कारकिर्दीची सुरवात २०१५-१६ मध्ये गोव्यातर्फे केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.