Plan Goa trip
Plan Goa trip Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Trip: गोव्याला पावसाळ्यात जायचा विचार करत असाल, तर 'या' रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या

Puja Bonkile

तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गोव्याला भेट देण्याचा विचार करत आहात का? तुमचे उत्तर हो असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फादेशीर ठरणार आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा सर्वोत्तम काळ असतो. मात्र ऑफ-सीझनमध्ये देखील गोव्याला भेट देणे खूप आनंदायी ठरू शकते. (Goa Monsoon TripPopular Shacks and Beach in Goa news)

पावसाळ्यात (Goa Trip in Monsoon) गोव्यातील हॉटेल्स स्वस्त आणि समुद्रकिनारे शांत असतात. तसेच ज्यांना पाऊस आवडतो त्यांच्यासाठी गोव्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. येथे येण्यासाठी तुम्हाला खूप माहिती गोळा करण्याची गरज नाही. कारण आम्‍ही तुम्हाला गोव्यातील सर्वात लोकप्रिय शॅक आणि समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंट्सविषयी (Popular Shacks and Beach in Goa) माहिती देणार आहोत.

तेरेझा बीच हाऊस, नेरुळ (Tereza Beach House, Nerul)

स्ली ग्रॅनी (Sly Granny) आणि मामागोटो (Mamagoto) यांच्या टीमने बनवलेले हे 136 सीटर शॅक आहे. तुम्ही येथे रात्रीच्या जेवणासह लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सचा आंनद घेउ शकता. येथे तुम्हाला विविध प्रकारचे स्वादिष्ट गोवन पदार्थ आणि पेयांची चव चाखता येइल.

ब्रिटोस, बागा (Brittos, Baga)

ब्रिटोस हे गोव्यातील बागा बीचवर (Baga Beach) 1965 पासून वसलेल्या सर्वात जुन्या आस्थापनांपैकी एक आहे. स्वादीष्ट सीफूडसाठी हे ओळखले जाते. तुमच्या जिभेचे चोचले पुरवणारे हे एक हे एक जबरदस्त शॅक आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटता येईल.

ला प्‍लेज, अश्‍वेम बीच (La Plage, Ashwem Beach)

ला प्‍लेज हे गोव्यातील () सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही जीभेचे चोचले पुरउ शकता. फ्रेंच, अमेरिकन आणि कॉन्टिनेंटल पदार्थांचा आस्वाद घेउ शकता. तुम्हाला फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि सीफूड हवे असल्यास अश्वेम बीचवरील हे शॅक तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाणा आहे.

लश बाय द क्लिफ, अंजुना (Lush by the Cliff, Anjuna)

तुम्हाला सूर्यास्त पाहायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी सर्वात योग्य ठिकाणं आहे. हे एक पूर्णपणे व्हाईट रेस्टॉरंट आहे. येथे तुम्ही कबाब, सॅलड्स, स्टीक्स आणि सिझलर्स पदार्थाची चव चाखु शकता. येथे सर्वोत्कृष्ट कॉकटेल मिळते. आपल्या जोडीदारासोबत जाण्यासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे.

सबलाइम , मोरजिम (Sublime, Morjim)

तुम्ही मांस प्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मोरजिममध्ये स्थित असलेले सबलाइम तोंडाला पाणी आणणाऱ्या अनेक पदार्थांची चव ताखु शकता. मांसाव्यतिरिक्त येथे स्वादिष्ट युरोपियन पदार्थांचा आस्वाद घेउ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT