Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात अवकाळी पाऊसामुळे नागरिकांची धांदल; पिकांना धोका शक्य

Goa Rain Update: कृषी विभागाच्या माहितीनुसार पावसाचा विपरीत परिणाम काजू व आंबा पिकावर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Update: गोवा राज्यात काल बहुतांश ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. सायंकाळी 7 नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच धांदल उडाली. दिवसभर राहिलेले ढगाळ वातावरण आणि या पावसाचा विपरीत परिणाम काजू व आंबा पिकावर होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

मंदौस चक्रीवादळ महाबलीपुरम जवळील उत्तर तामिळनाडू किनारपट्टी ओलांडून तामिळनाडूकडे सरकले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस राज्यातील वातावरणात आर्द्रता निर्माण होऊन राज्यात पावसाची शक्यता असल्याचे गोवा वेधशाळेने सांगितले होते. वेधशाळेचा अंदाज खरा ठरत आज पाऊस झाला.

साकोर्डा भागात सकाळपासून हवामानात अचानक बदल होऊन दमटपणा जाणवत होता. तर काही भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर दुपारी गडगडाटायला सुरवात झाली होती. संध्याकाळी 7 नंतर साकोर्डा परिसरात जोरदार सरी कोसळल्याने वातावरणात ओलावा निर्माण झाला.

बोळकर्णे परीसरात साधारणपणे अर्धातास पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय झाली होत. तसेच पणजी, पेडणे, सत्तरी, डिचोली, कोणकोण आदी भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या.

किर्तीराज नाईक गावकर, विभागीय कृषी अधिकारी, काणकोण-

थंडीच्या मोसमात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा विपरीत परिणाम काजू व आंबा पिकावर होणार आहे. सध्या काजू व आंब्याला मोहर येण्यास सुरवात झाली आहे. दोन्ही पिकांसाठी थंडी व भरपूर तापमानाची गरज आहे. अन्यथा मोहराला बुरशीचा रोग जडून मोहर करपतो. त्याचा परिणाम दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

Pilgaon Panchayat: आम्हाला 'फ्लायओव्हर' नकोच, पिळगाव ग्रामसभेत ठराव; 'मायनिंग' विषयही गाजला

Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

काँग्रेस अध्यक्ष खर्गे सोमवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, संघटनात्मक तयारीवर दक्षिण गोव्यात होणार 'पीएसी'ची महत्त्वपूर्ण बैठक

SCROLL FOR NEXT