Goa Weather  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: आता तापमानाची मिळेल योग्य अन्‌ वेळेत माहिती!

Goa Weather: नागरिकांना हवामानाची योग्य माहिती वेळेत मिळावी, यासाठी गोवा वेधशाळेद्वारे हवामान केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Weather: नागरिकांना हवामानाची योग्य माहिती वेळेत मिळावी, यासाठी गोवा वेधशाळेद्वारे पावले उचलली जात असून राज्यात अजून चार पाच ठिकाणी नव्याने स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, ही केंद्रे वर्षभरात पूर्ण केली जाणार असल्याची माहिती गोवा (Goa) वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी दिली. सद्याच्या केंद्रांद्वारे प्रत्येक पंधरा मिनिटांनी हवामानाची माहिती उपलब्ध होते. तसेच बदल, पाऊस, तापमान याची माहिती सर्वांना नाउकास्ट, एस.एम.एस. यासोबतच विविध प्रकारच्या समाजमाध्यांद्वारे पुरविली जाते.

मौसम दामिनीसह मेघदूतही

भारतीय हवामान विभागाद्वारे मौसम दामिनी आणि मेघदूत असे ॲप निर्माण केले आहेत. मौसमद्वारे सर्वमान्यपणे हवामानाची माहिती पुरविली जाते. दामिनीद्वारे विजासंबंधी तर मेघदूतद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती दिली जाते. सोबतच शेतकऱ्यांसाठी ‘आयसीएआर’ सोबत मिळून ‘आयएमडी’ कृषी मार्गदर्शक पत्रिका आठवड्यातून दोनदा प्रसिध्द करते.

येथे होणार केंद्रे

फोंडा, पेडणे, सासष्टी, सांगे (Sanguem), धारबांदोडा या तालुक्यांमध्ये नवीन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव असून अजून जागा निश्‍चत झालेल्या नाहीत. येत्या काळात त्या निश्‍चित केल्या जातील. पेडणे मोपा विमानतळाशेजारी एक केंद्र होणार असल्याचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी सांगितले.

एम. राहुल, वैज्ञानिक-

राज्यात आता आणखी केंद्रे उभारली जातील. नागरिकांनी देखील पब्लिक ऑब्जरवेशन ॲप द्वारे आपल्या परिसरातील माहिती कळविल्यास अभ्यासाद्वारे अधिक चांगले अनुमान देणे शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT