Goa News: गोव्यात वाहतूक परवाने प्रक्रियेला वेग!

Goa News: कोविड काळात बंद करण्यात आलेले पर्यटन टॅक्सी परवाने देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
Goa News | License
Goa News | License Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: कोविड काळात बंद करण्यात आलेले पर्यटन टॅक्सी आणि रेंट-ए- मोटरसायकल परवाने देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान पर्यटन टॅक्सीचे 1,038 परवाने तर रेंट-ए-मोटरसायकलचे 155 नवीन परवाने देण्यात आल्याची माहिती वाहतूक खात्याने ‘गोमन्तक’ला दिली.

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे नवीन परवाने देण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दोन वर्षांच्या ‘ब्रेक’नंतर आता परवाने देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजताच नवीन परवान्यांसाठी मोठ्या संख्येत अर्ज करण्यात आलो होते.

Goa News | License
Goa Rain: वादळी वाऱ्यासह पाऊसाची जोरदार हजेरी; अर्ध्या तासात वाळपई जलमय!

तसेच, त्यानंतर अर्जदारांनी पणजीतील जुंता हाऊस येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयात गर्दी केली. ‘रेंट-अ-कार’ चाही यात समावेश आहे. देण्यात येणारे परवाने हे अखिल भारतीय परमिटचे आहेत, असे खात्याने स्पष्ट केले आहे.

परवान्यांची आकडेवारी अशी: 10,9294 अखिल भारतीय परमिट पर्यटक टॅक्सी, 3,836 रेंट-अ-कॅब, 17,820 रेंट-अ- मोटरसायकल, 757 काळी पिवळी, 1,225 काळी पिवळी मोटरसायकल, 1,233 रिक्षा आहेत.

Goa News | License
Zilla Panchayat Election : दवर्लीत भाजपची हॅटट्रिक, परेश नाईक यांचा दणदणीत विजय

भालचंद्र सावंत, सहाय्यक वाहतूक संचालक-

वाहतूक (Traffic) परवन्यांची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. ‘रेंट-अ- मोटरसायकल परवान्यांची संख्या वाढल्याने यावर मर्यादा ठेवण्याच्यासाठी पाच परवाने असलेल्यांना अतिरिक्त पाच परवाने दिले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com