Goa Drugs Racket Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Racket: म्हापशात वॉशिंग मशीनमध्ये लपवलेली 50 लाखांची रोकड जप्त

गोवा आणि हैद्राबाद दरम्यान चालणाऱ्या आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करी व हवाला व्यवहारांच्या रॅकेटचा भांडाफोड करत तेलंगणातील अंमलीपदार्थविरोधी पथक आणि गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा आणि हैद्राबाद दरम्यान चालणाऱ्या आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करी व हवाला व्यवहारांच्या रॅकेटचा भांडाफोड करत तेलंगणातील अंमलीपदार्थविरोधी पथक आणि गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. म्हापसा येथे झालेल्या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ५० लाख रुपयांची रोकड एका वॉशिंग मशीनमध्ये लपवलेली अवस्थेत जप्त केली आहे.

हैदराबादमधून गोवाकडे जाणारा ड्रग्ज पुरवठा नेटवर्क उघड

या प्रकरणात नायजेरियन नागरिक इमॅन्युएल बेदियाचो ऊर्फ मॅक्सवेल बाला याची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून सुमारे १.२५ कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडीएमएस प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

मॅक्सवेल गेली अनेक वर्षे गोव्यात येत-जात होता आणि उच्च किंमतीचे अमलीपदार्थ गोव्यात विकून, अन्य राज्यांमध्ये त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत होता. त्याचे संबंध इतर नायजेरियन नागरिकांशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

तपासातून समोर आले की, गोवा हे केंद्रस्थान बनवून ड्रग्ज तस्करीचे जाळे विस्तारले गेले होते. ड्रग्ज गोव्यातून मागणीप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांतील ग्राहकांपर्यंत कुरिअर, संपर्क व्यक्ती आणि हवाला माध्यमातून पोहोचवले जात होते.

कारवाई सुरू

या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ड्रग्ज ग्राहकांची यादी पोलिसांनी हस्तगत केली असून त्यावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. या तपासादरम्यान ड्रग्ज आणि हवाला व्यवहाराचे अनेक धागेदोरे समोर येत असून आणखी काही नावे लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गोवा पोलिसांकडून या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून हवाला व्यवहार व बेकायदेशीर रोकड जप्ती प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखाही तपासात सामील झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT