Goa: पत्रादेवी चेकनाक्यावर प्रचंड गर्दी, कोरोना तपासणीचे तीन तेरा Dainik Gomantak
गोवा

Goa: पत्रादेवी चेकनाक्यावर प्रचंड गर्दी, कोरोना तपासणीचे तीन तेरा

प्रवासी चेकनाक्यावर आपल्याकडे कोरोना प्रमाणपत्र आहे कि नाही यांची नोंद करण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात.

दैनिक गोमन्तक

मोरजी: कोरोना महामारीचा काळ कायम असतानाच पत्रादेवी चेक नाक्यावर कमी मनुष्यबळ, कमी पोलीसबल आणि कोरोना टेस्ट करण्याची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने प्रवाशाना या नाक्यावर तीन तीन तास ताटकळत राहावे लागते, पर्यटकासाठी त्या ठिकाणी सरकारने शौचालय, मुतारी किंवा नास्ता चहा यांची सोय केली नाही, शिवाय बँक एटी एम नसल्याने नागरिकांची बरीच धांदल होते, एकाचवेळी 200 ते तीनशे नागरिक रांगेत उभे असल्याने पोलिसाना यावर नियंत्रण मिळवताना अडचणी येतात शिवाय कोरोना टेस्ट करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे.

या नाक्यावरून पर राज्यातील हजारो नागरिक पर्यटक लहान मोठी वाहने घेवून येतात. ते प्रवासी चेकनाक्यावर आपल्याकडे कोरोना प्रमाणपत्र आहे कि नाही यांची नोंद करण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. त्या ठिकाणी दोन खाजगी आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी केली जाते तिथेही अडगळीत स्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करावे लागते एका एका नागरिकांची टेस्ट करण्यासाठी 15 ते वीस मिनिटे जात असल्याने गर्दी वाढत आहे. शिवाय मनुष्बळ कमी असल्याने गर्दीत भर पडत आहे.

पत्रादेवी चेकनाक्यावर पहाटे साडेपाच वाजल्यापासून प्रवासी बसेस यायला सुरुवात होते, एकामागून एक प्रवासी बसेस येयून रांगा करतात , आपल्याकडे असलेल्या कोरोना प्रमाणपत्राची तपासणी करतात, एखाद्या प्रवाश्याकडे कोरोना दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्याने त्याना रांगेत राहून टेस्ट करावी लागते, एकामुळे शेकडो प्रवाश्याना ताटकळत राहावे लागते,जे पहाटेपासून प्रवासी नाक्यावर येतात त्याना या ठिकाणी कसल्याची सोयी सुविधा नाही, चेन्गिंग रूम, शौचालय , मुतारी किंवा चहाचा स्टोल नाही, तासंनतास प्रवाश्याना उपाशीच राहावे लागते. प्रचंड प्रमाणात गर्दी लोटत असल्याने कमी प्रमाणात पोलीस बल असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसाना बरीच कसरत करावी कलागती. हातातला पोलिसी दांडा दाखवून प्रवाश्याना भीती घालावी लागते

याविषयी पुणे येथील एका प्रवाश्याने पोलीसासमक्ष प्रतिक्रिया देताना आपण मुला बाळासहीत मागच्या चार तासा पासून रांगेत उभे आहोत, या ठिकाणी मुतारीची सोय नाही, भूक लागली तर खायलाही काही नाही आणि या अडचणीत पोलीस आम्हाला दंडुक्याने मारतात अशी प्रतिक्रिया दिली. एका प्रवाशाने तर सांगितले या ठिकाणी जी कोरोना टेस्ट केली जाते त्यात काहीच अर्थ नाही, एकही सकारात्मक कोरोना रुग्ण सापडत नाही.

माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ यांनी प्रतिक्रिया देताना सरकारने अगोदर नाक्यावर सर्व सोयीसुविधा प्रवाश्यासाठी पुरवण्याची गरज होती, आरोग्य विभागाची तपासणी, पोलीस आणि उपजिल्हाधिकारी मार्फत होणारी तपासणी स्वतंत्र खोल्यात व्हायला हव्यात, या ठिकाणी जी प्रचंड गर्दी होते. त्यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. शौचालय सोय नसल्याने नागरिक लोकवस्तीत येवून शौचालय बाथरूम वापरण्यासाठी मागणी करतात मात्र स्थानिक रहिवासी कोरोनाची भीती समोर करून शौचालय वापरण्यास हरकत घेतात, शिवाय काही वाहनचालक गावात येवून कुणी गुगल पे वाहतूक खात्याला करतो कि काय अशी वारंवार विनवणी करत असतात. या अडचणी लक्षात घेवून सरकारने निदान त्या ठिकाणी एटीएम सोय करावी शिवाय वाहतूक खात्याचे कार्यलय आहे त्यात रोख पैसे किंवा अधिकाऱ्याकडे रोख पैसे दिल्यावर त्यांनी गुगल पे आपल्या खात्यातून गुगल पे करून घ्यावे अशी मागणी रमेश सावळ यांनी केली आहे. वाहतूक विभागाकडे काही वाहनचालाकाना परमिट मिळवण्यासाठी पैसे भरावे लागतात ते रोख न घेत असल्याने नागरिकाना गुगल पे करावे लागते, सगळ्याकडेच या सुविधा नसतात त्यामुळे अडचणी येत असतात.

कडक तपासणी

मागच्या चार दिवसापूर्वी या नाक्यारून दोन प्रवासी बसेस कोरोना तपासणी चुकवण्यासाठी पळून गेल्या होत्या, पोलिसांनी नंतर धावपळ करून दोनी वाहने पकडली, व दोनी वाहनचालक व क्लीनरवर गुन्हे नोंद करून त्याना अटक केली होती. त्यानंतर या नाक्यावरून सर्व बसेस प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

SCROLL FOR NEXT