Goa Election: नीलेश काब्राल परंपरा मोडणार काय?
मुंबई: मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) असलेल्या 3-स्टार हॉटेलमध्ये एका खाजगी पार्टीमध्ये दक्षिण गोव्यातील (South Goa) केपेममधील सुप्रसिद्ध राजकारणीचा गुप्तपणे चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (The video went viral on social media) झाला आहे. या विवादास्पद राजकारणी व्हिडिओमध्ये एका ज्ञात मुंबईच्या चक्रावून टाकणाऱ्या आणि उल्हासनगरमधील एका छोट्या-छोट्या वादग्रस्त बिल्डरसोबत तडजोडीच्या स्थितीत दिसत आहे.
दोन भाग किंवा दोन क्लिप आहेत. पहिल्या भागात, क्युपेम राजकारणी त्याच्या बिल्डर मित्र आणि दोन महिलांसह रात्रीच्या वेळी 3-स्टार हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसतात. क्युपेम राजकारणी एका स्त्रीला (एक ज्ञात मॉडेल/एस्कॉर्ट) कंबरेने धरून तिला हॉटेलमध्ये मार्गदर्शन करत आहे, तर उल्हासनगरच्या बिल्डरने दुसऱ्या (अज्ञात) महिलेला पकडले आहे. राजकारणीची अस्थिर चाल आणि चालणे सूचित करते की तो दारूच्या नशेत किंवा मद्यधुंद अवस्थेत आहे. जोडपे एका मेजवानीच्या खोलीत प्रवेश करतात जिथे स्पष्टपणे दिसते की खाजगी पार्टी जोरात संगीतासह चालू आहे.
दुसऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये किंवा दुसऱ्या भागात, राजकारणी आणि महिला एका हॉटेलच्या खोलीत आणि तडजोडीच्या स्थितीत आहेत, तर बिल्डर-व्यापारी आणि त्याची महिला भागीदार दिसणार नाहीत.
थोडं थांबायच्या नंतर, असे दिसते की क्लिप सुमारे 16 किंवा 20 दिवस आधी पोस्ट केल्या गेल्या होत्या आणि आमच्या निदर्शनास येण्यापूर्वी अनेक वेळा शेअर केल्या गेल्या. सोशल मीडियावर दोन संपादने फिरत आहेत, पहिल्या संपादनात दोन्ही क्लिप एकत्र केल्या आहेत आणि जवळजवळ 4.55 मिनिटांच्या आहेत, तर दुसरी आवृत्ती आहे जिथे पहिली आणि दुसरी क्लिप वैयक्तिक व्हिडिओ फाइल म्हणून अपलोड केली जाते.
संबंधित राजकारणी कथित आर्थिक आणि जुगाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी केंद्रीय एजन्सींकडून चौकशी केली जात होती. त्याने दोन वर्षांपूर्वी किनारपट्टी पर्यटन राज्यातील इतर अनेक राजकारण्यांसह पक्ष बदलले.
मनोदय फडते
कुडचडे, ता. २४ : कुडचडे मतदारसंघ हा सत्ताधाऱ्यांचा मतदारसंघ आहे. राज्यात कोणाचेही सरकार असो, येथील आमदार हा मंत्री बनतो. पहिल्या वेळी नसल्यास दुसऱ्यांदा संधी हमखास मिळत असते. अपवाद मात्र शाम सातार्डेकर यांचा. ते दुसऱ्यांदा निवडणूक हरले. या आधी वैकुंठ देसाई, डॉमनिक फर्नांडिस, रामराव देसाई हे मंत्री बनले. आता नीलेश काब्राल मंत्रिपदी आहेत. म्हणजे काही झाले तरी इथला आमदार हा सत्तेत असण्याचे भाग्य या मतदारसंघाला लाभले आहे.
मतदारसंघांचे क्षेत्रफळ लहान पण मतदाराची संख्या अधिक आहे. कुडचडे पालिका क्षेत्र आणि असोल्डा व शेल्डे या दोन ग्रामपंचायती या मतदारसंघात येतात. कुडचडेचे क्षेत्रफळ लहान असल्यामुळे विकासकामे नजरेत भरतात. कुडचडे हे व्यापारी केंद्र असल्यामुळे बाजारात येणारे लोक विकासकामांवर चर्चा करतात.
तिसऱ्यांदा संधी नाही!
येथील मतदारांना कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा संधी दिलेली नाही. आतापर्यंत वैकुंठ देसाई, डॉमनिक फर्नांडिस, रामराव देसाई यांनाही तिसऱ्या वेळी घरचा रस्ता दाखविला आहे. आता विद्यमान आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल हे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने कुडचडेचे मतदार आपली परंपरा कायम राखणार की काब्राल यंदा परंपरा मोडणार, ते आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे मंत्री बनल्यानंतर आमदारांचा पराभव कुडचडेत होत असतो, असे आजवर घडले आहे.
लाभ नक्की कुणाला?
काँग्रेस पक्षात सध्या हर्षद गावस देसाई, बाळकृष्ण होडारकर, अमित पाटकर हे तिघे जण उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. त्यात रामराव देसाई हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशीही चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार शाम सातार्डेकर यांचाही पाठिंबा लाभला, तर काँग्रेस बाजी मारू शकेल. तसेच मगो पक्षाचे आनंद प्रभू देसाई, आप तर्फे गॅब्रियल फर्नांडिस, जेम्स फर्नांडिस असे तुल्यबळ उमेदवार तयारीला लागले आहेत.
काँग्रेसमध्ये इच्छुक अधिक
ॲड. हर्षद गावस देसाई हे सुरवातीपासून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचे दावेदार मानले जात आहेत. तसेच उद्योजक अमित पाटकर यांनी अप्रत्यक्ष सहभाग दाखवीत सामाजिक, आरोग्य, कृषी, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेत काँग्रेस पक्षात केलेला प्रवेश लक्षवेधी ठरला. विद्यमान नगरसेवक आणि एकेकाळी मंत्री नीलेश काब्राल यांचे उजवे हात मानले जाणारे बाळकृष्ण (पिंटी) होडारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री रामराव देसाई यांचेही नाव काँग्रेस उमेदवार म्हणून घेतले जात आहे.
...तर मतविभाजन अटळ
या मतदारसंघात कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार घोषित केलेला नाही. तरीही भाजपमध्ये काब्राल विरुद्ध उघडपणे पक्षातील अन्य इच्छुक ‘उमेदवार’ म्हणून पुढे येत नाहीत. रामराव देसाई हे इच्छुक असल्याचे सांगतात. काँग्रेसला कुडचडेत जनाधार वाढू लागला आहे. संघटितपणे काँग्रेसजनांनी लढत दिल्यास भाजपला निवडणूक कठीण जाईल. तसे झाले नाही तर मतविभाजन होऊन भाजप जिंकून येऊ शकतो.
मगो पक्ष लक्ष वेधणार
या मतदारसंघाची धुरा मगो पक्षाने आनंद प्रभू देसाई यांच्या खांद्यावर सोपविली आहे. पालिका निवडणुकीत प्रभू देसाई यांनी चांगली कामगिरी करीत पत्नीला दुसऱ्यांदा निवडून आणले. तसेच अजून एक नगरसेवक निवडून आणला. त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची मते विचारात घेतली तर प्रभू देसाई भाजपला धोकादायक ठरू शकतात.
कायदामंत्री पराभूत!
कुडचडे मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येणारा नेता तिसऱ्यांदा निवडून येत नाही हे जरी सत्य असले तरी कायदामंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले तिसऱ्या वेळी पराभूत होतात हा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास आहे. या पूर्वी डॉमनिक फर्नांडिस दुसऱ्या वेळी कायदामंत्री बनले. तिसऱ्यांदा पराभूत झाले. रामराव देसाई दुसऱ्यांदा कायदामंत्री बनले तिसऱ्यांदा पराभूत झाले. आता काब्राल दुसऱ्यांदा कायदामंत्री बनले आहे आणि तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
‘आप’चा चंचूप्रवेश
कुडचडे मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षातर्फे गॅब्रियल फर्नांडिस यांनी आपली पत्नी क्लेमेंटिना फर्नांडिस यांना नगरसेविका म्हणून निवडून आणले. यामुळे मतदारसंघात ‘आप’ने चंचू प्रवेश करीत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. ख्रिस्ती मतदार व अन्य धर्मीय मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न जेम्स फर्नांडिस यांनी केला आहे. ‘आप’ जेवढा सक्रिय होईल तेवढा काँग्रेस किंवा भाजपला हानीकारक ठरू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.