Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

नरकासूर स्पर्धा रोखण्यासाठी ढवळीकरांना देवाने दिली चांगली संधी; पर्वरीतील स्पर्धेवरुन काँग्रेसचा खोचक टोला

नरकासूर स्पर्धेला गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली

Pramod Yadav

Narkasur Competition on Housing Board Plot at Porvorim: पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या भूखंडावर नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा गृहनिर्माण मंडळाने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना आवश्यक परवानगी दिल्याचे गृहनिर्माण मंत्री रामकृष्ण उर्फ ​​सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट करावे तसेच गृहनिर्माण मंडळाचे एमडी सुधीर केरकर यांची अचानक बदली करण्याचे कारण काय?

यावर उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

नरकासूर स्पर्धेला गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

जमीन गोवा गृहनिर्माण मंडळाच्या मालकीची असून, एका खाजगी कंपनीला लिलाव करण्यात आली होती आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याच कारणाने हाऊसिंग बोर्डाच्या एमडींनी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी नाकारली, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

नरकासूर स्पर्धा रोखण्यासाठी देवाने गृहनिर्माण मंत्री सुदिन ढवळीकर यांना चांगली संधी दिली आहे. यामुळे नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यावर होणारा सरकारी पैसाही वाचेल असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

सुदिन ढवळीकर यांनी मगोचे आमदार तथा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांना हस्तक्षेप करण्यास सांगून गृहनिर्माण मंडळाच्या न्यायप्रविष्ट जागेत आयोजित नरकासूर स्पर्धा आयोजित करण्याचे बेकायदेशीर कृत्य थांबवावे, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Price Hike: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर

Arpora Nightclub Fire: नाईटक्लबवर मेहेरबानी भोवली; हडफडे पंचायत सचिव बडतर्फ तर सरपंच अपात्र! कारवाईचा बडगा कठोर; आता नंबर कोणाचा?

Horoscope: नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

सारा तेंडुलकरच्या हातातील 'त्या' बाटलीवरुन सोशल मीडियावर गदारोळ! गोव्यातील व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सचिनच्या लेकीला केलं ट्रोल VIDEO

Bollywood: 2025 गाजवले छावा, धुरंधरने! सलमानसह अनेक स्टार्सचे सिनेमे फ्लॉप; वाचा 'या' वर्षाचा बॉलिवूडचा आलेख

SCROLL FOR NEXT