House Fire Dainik Gomantak
गोवा

House Fire: शिंगणे-शेळपे येथे घराला आग; 5 लाखांचे नुकसान, अग्निशमन दलाने वाचविली 10 लाखांची मालमत्ता

Shingane Shelpe House Fire: सत्तरी तालुक्यातील शिंगणे-शेळपे येथे बुधवारी दुपारी अश्विनी ए. सुर्लकर यांच्या राहत्या घराला आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील शिंगणे-शेळपे येथे बुधवारी दुपारी अश्विनी ए. सुर्लकर यांच्या राहत्या घराला आग लागून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. घराच्या मागील खोलीतील साहित्य जळून खाक झाले.

वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. जवानांच्या प्रयत्नांमुळे सुमारे १० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

दुपारी पावणेदोनच्‍या सुमारास प्राथमिक शाळेजवळील सुर्लकर यांच्या घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. सतीश के. नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले.

स्थानिक पंच संध्या खाडीलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सुर्लकर कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच आमदारांच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Officers Prosecutor Case: संशयित पोलिसांच्या बचावासाठी सरकारी वकील? गोवा खंडपीठाची अभियोजन संचालकांना नोटीस

IND vs NZ: ईशान किशनचं कमबॅक... 19 चेंडूंत 45 धावा करूनही वैभव सूर्यवंशी बेंचवर? चौथ्या टी-20 पूर्वी टीम इंडियासमोर मोठा पेच!

Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

Shocking! वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 3 टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूचा अचानक मोठा निर्णय

खरी कुजबुज: भाजपमध्ये उमेदवारांची झुंबड, विरोधकांत गटबाजीचा गोंधळ

SCROLL FOR NEXT