Teacher Regularization Dainik Gomantak
गोवा

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Goa Hourly Teachers Regularization: सरकारी उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक शाळांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू केली जाईल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सरकारी उच्च माध्यमिक आणि व्यावसायिक शाळांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया १५ दिवसांत सुरू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याची माहिती कामगार नेते ॲड. अजय प्रभुगावकर यांनी दिली.

प्रभुगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कोणत्याही शिक्षकाला सेवेतून कमी केले जाणार नाही, याची खात्री करण्याबरोबरच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी दहा वर्षांहून अधिक सेवा केलेल्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. उच्च माध्यमिक शाळांमध्ये १५० हून अधिक, तर हायस्कूलमध्ये १०० हून अधिक तासिका तत्त्वावरील शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांनी दहा वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. काही व्यावसायिक शिक्षकांनी २० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली असून, त्यांचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही प्रभुगावकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

SCROLL FOR NEXT