Casino License Suspension Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

Casino License Suspension: वारंवार सूचना देऊनही शासनाचे वार्षिक पुनरावर्ती शुल्क न भरल्याने गृह खात्याने दोन कॅसिनोंवर कठोर कारवाई करत तत्काळ प्रभावाने त्यांचे परवाने स्थगित केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वारंवार सूचना देऊनही शासनाचे वार्षिक पुनरावर्ती शुल्क न भरल्याने गृह खात्याने दोन कॅसिनोंवर कठोर कारवाई करत तत्काळ प्रभावाने त्यांचे परवाने स्थगित केले आहेत. बिग बी लीझर एलएलपी आणि मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. या दोन्ही संस्थांनी सरकारी महसूल थकविल्याची नोंद असून, परवान्याच्या अटी क्रमांक ६ चे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.

सरकारने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी बिग बी लीझर एलएलपीला हडफडे नागोआ येथील पंचतारांकित ‘रिओ रोयाले’ हॉटेलमध्ये (Hotel) इलेक्ट्रॉनिक अम्युझमेंट गेम्स/स्लॉट मशीन बसविण्याची अनुमती दिली होती. संकेतस्थापनेच्या परवान्याच्या अटींनुसार शासनाकडून मुद्दल व वार्षिक शुल्क भरणे बंधनकारक आहे. मात्र १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळातील ३ कोटी रुपये आणि १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील ११ कोटी रुपये शुल्क थकविल्यामुळे बिग बी लीझरला १५ जुलै २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यास उत्तर न आल्याने त्यांचा परवाना तत्काळ स्थगित करण्यात आला आहे.

मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. या दुसऱ्या कंपनीकडून कळंगुट येथील ॲव्हेन्यू ग्रॅण्ड येथे कसिनो चालवण्यासाठीचे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील २२ कोटी रुपये शुल्क बाकी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. हे शुल्क न भरता परवाना अटींचे उल्लंघन केल्याने १४ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आलेला त्यांचा कॅसिनो परवाना देखील तात्काळ परिणामाने निलंबित करण्यात आला आहे.

सरकारच्या आदेशानुसार मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. यांना कॅसिनोचे संचालन त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच थकीत २२ कोटी रुपये आणि विलंब व्याज (वार्षिक १८ टक्के) सात दिवसांच्या आत महसुल खात्यात भरायला सांगण्यात आले आहे. अन्यथा, संबंधित रक्कम जमीन महसूल थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, हडफडे येथे क्लबला आग (Fire) लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने शुल्क न भरल्याने दोन कसिनोंचे कामकाज बंद करणारे दोन वेगवेगळे आदेश आज जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस महासंचालकांवर दिली आहे. गृह खात्याचे अवर सचिव (१) मंथन नाईक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.

यांच्यावर कारवाई

बिग बी लीझर एलएलपी, हडफडे. : थकित रक्‍कम १४ कोटी

मॅचोस एंटरटेनमेंट प्रा. लि. कळंगुट : थकित रक्‍कम २२ कोटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT