Cemetery Dainik Gomantak
गोवा

गोव्याला तौक्ते वादळाचा मोठा फटका, लाखोंचे झाले नुकसान

गोव्यात (Goa) तौक्ते वादळामुळे अनेकांच्या घराबरोबर सार्वजनिक असलेल्या सभागृहांना नुकसान झाले होते.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोव्यात (Goa) तौक्ते वादळामुळे अनेकांच्या घराबरोबर सार्वजनिक असलेल्या सभागृहांना नुकसान झाले होते. यात वास्को खारीवाडा समुद्रकिनार्‍यावरील मुरगाव (Murgaon) हिंदू समाजाच्या स्मशानभूमीला सुद्धा तौक्ते वादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला होता. तसेच सतत पडत असलेल्या पावसामुळे स्मशानभूमीचे काम सुरू करणे मुश्कील होते. नंतर समाजाने स्मशानभूमीचे काम हाती घेऊन अंदाजे 10 लाख 50 हजार रुपये खर्चून चांगल्या सुविधा उपलब्ध करून स्मशानभूमीचे काम पूर्ण केले असल्याची माहिती मुरगांव हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

वास्को मुरगाव हिंदू समाजाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे उपाध्यक्ष शेखर खडपकर, सचिव संतोष खोर्जुवेकर व स्मशानभूमी देखभाल समितीचे कृष्णा साळकर (Krishna Salkar) उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देताना सचिव संतोष खोर्जुवेकर म्हणाले की मुरगाव नगर पालिकेच्या ताब्यात असलेली वास्को खारीवाडा समुद्रकिनाऱ्याजवळ हिंदू स्मशान भूमीची देखभाल करण्याची जबाबदारी मुरगाव हिंदू समाजाला देण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी स्मशानभूमीचे काम समाजाला करावे लागते. यात समाजाचे अध्यक्ष नारायण बांदेकर यांच्या एन आर बी ग्रुपतर्फे स्मशानभूमीचे काम केले जाते. यासाठी मुरगाव नगरपालिकेची परवानगी घेतली जाते. तौक्ते वादळामुळे वास्को खारीवाडा येथील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. स्मशानभूमी समुद्रकिनारी असल्याने दरवर्षी एन आर बी ग्रुप तर्फे स्मशानभूमीची दुरूस्ती केली जाते. तौक्ते वादळामुळे यंदा स्मशानभूमीला खूपच नुकसान झाल्याने एन आर बी ग्रुप व इतरांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे स्मशानभूमीचे काम बऱ्यापैकी केले आहे. अशी माहिती खोर्जुवेकर यांनी दिली.

उपाध्यक्ष शेखर खडपकर (Shekhar Khadapkar) यांनी सांगितले की उद्योगपती नारायण बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री महालक्ष्मी पूजन व वास्को खारीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीचे कार्य योग्यरीत्या होत आहे. तौक्ते वादळामुळे खारीवाडा स्मशानभूमीचे खूपच नुकसान झाले होते. यात बांदेकर यांचा एनआरबी ग्रुपचा बऱ्यापैकी आर्थिक सहकार्य लाभल्याने स्मशानभूमीचे काम चांगले झाले. स्मशानभूमी देखबाल समितीचे सदस्य कृष्णा साळकर यांनी स्मशानभूमीचे काम योग्यरीत्या केले असून जर कोणाला स्मशानभूमी देखबाल करण्यासाठी आर्थिक सहकार्य करायचे असेल तर मुरगाव व हिंदू समाजाकडे येऊन संपर्क साधावा. एनआरबी ग्रुपने नारायण बांदेकर स्मशानभूमीचे काम करण्यासाठी सदैव पुढाकार घेतला असल्याने आज चांगल्या सुविधा उपलब्ध करून स्मशानभूमी उभी केली आहे. त्याच्या सहकार्यामुळे वास्कोत विविध समाज उपयोगी कामे मार्गी लागले असल्याची माहिती साळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT