Gomeco Hospital
Gomeco HospitalDainik Gomantak

प्रेयसीवर खुनी हल्ला करणाऱ्या दोडामार्गच्या युवकाचे गोमेकॉत निधन

परशुराम गवस (Parashuram Gavas) (21) या दोडामार्ग (Dodamarg) येथील युवकाचे आज सकाळी गोमेकॉत निधन झाले.
Published on

मडगाव: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या अवस्थेत आपली प्रेयसीवर खुनी हल्ला करून नंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या परशुराम गवस (Parashuram Gavas) (21) या दोडामार्ग (Dodamarg) येथील युवकाचे आज सकाळी गोमेकॉत निधन झाले.

काल गंभीर अवस्थेत त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तिथे उपचार चालू असताना आज सकाळी साडे आठच्या सुमारास त्याचे निधन झाले अशी माहिती फातोर्डाचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. दरम्यान जखमी प्रियेसीची प्रकृती सुधारत असून तिच्यावर सध्या मडगावच्या जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहेत.

Gomeco Hospital
म्हापशातील ‘कॉसमॉस’मध्ये आग; लाखोंची खेळणी खाक

सदर युवक मूळ दोडामार्ग येथील असून डिचोली येथे एका कुरियर कंपनीत तो कामाला होता. ही मावळींगे डिचोली येथील असून ती जिल्हा इस्पितळात एक्स रे विभागात काम करत असे. त्या दोघांचे बऱ्याच दिवसापासून प्रेम होते. पण दोघेही एकाच कुल दैवताला भजणारी कुटुंबे आल्याने प्रियेसीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. घरच्यामुळे आपण तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे प्रियेसीने सांगितल्यावर आपल्या प्रेयसीचा खून करून नंतर स्वतःही संपून जाण्याच्या इराद्याने काल सकाळी मडगावच्या जिल्हा इस्पितळाजवळ त्याने हे कृत्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com