Special Trains  Dainik Gomantak
गोवा

Special Trains For Velankanni Onam Festival: वालांकिणी, ओणम उत्सवासाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक..

गोमन्तक डिजिटल टीम

Special Trains For Velankanni Onam Festival दक्षिण- पश्चिम रेल्वेच्यावतीने वेलंकनी आणि ओणम उत्सवासाठी विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वास्को दा गामा - वेलंकन्नी - वास्को दा गामा स्पेशल एक्सप्रेस आणि नागरकोइल - पनवेल - नागरकोइल स्पेशल (साप्ताहिक) अशा दोन गाड्या भाविकांसाठी धावणार असून रेल्वे खात्यातर्फे या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेले ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-

गाडी क्र. 07361 वास्को दा गामा - वेलंकन्नी - वास्को दा गामा स्पेशल एक्सप्रेस ही वास्को दा गामा येथून रविवार, शुक्रवार आणि बुधवार (म्हणजेच दि. 27ऑगस्ट, 01 सप्टेंबर आणि 06 सप्टेंबर रोजी) 21:55 वाजता सुटेल आणि ही ट्रेन तिसर्‍या दिवशी 03:50 वाजता वेलंकन्नीला पोहोचेल.

ही ट्रेन मडगाव जंक्शन, सनवोर्डेम करचोरम, कुलेम, कॅसल रॉक, लोंडा जंक्शन, धारवाड, हुब्बल्ली, एसएमएम हावेरी, रानीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, चिकजाजूर जंक्शन, बिरूर जंक्शन, अर्सीकेरे जंक्शन, तिप्तूर, एसएमव्हीटीकू येथे थांबेल. बेंगळुरू, व्हाईट फील्ड, बंगारापेट, सेलम जं., रसीपुरम, नमक्कल, करूर जं., तिरुचिरापल्ली जं., तंजावर जं., तिरुवरूर जं. आणि नागपट्टिनम जं. स्थानके या मार्गावरून धावेल.

गाडी क्र. 07362 वेलंकन्नी - वास्को दा गामा स्पेशल एक्सप्रेस ही वेलंकन्नी येथून बुधवार, सोमवार आणि शनिवार (म्हणजेच दि. 30 ऑगस्ट, 04 सप्टेंबर आणि 09 सप्टेंबर रोजी 01:20 वाजता सुटेल आणि ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 08:00 वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल

ट्रेन क्र. 06071 / 06072 नागरकोइल - पनवेल - नागरकोइल स्पेशल (साप्ताहिक)

गाडी क्र. 06071 नागरकोइल - पनवेल स्पेशल (साप्ताहिक) नागरकोइल येथून दर मंगळवारी 22ऑगस्ट, 29 ऑगस्ट आणि 05 सप्टेंबर रोजी रात्री 11:35 वाजता सुटेल. सदर ट्रेन दुसऱ्या दिवशी 22:45 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 06072 पनवेल - नागरकोइल स्पेशल (साप्ताहिक) पनवेल येथून दर गुरुवारी 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 07 सप्टेंबर रोजी 00:10 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता नागरकोइलला पोहोचेल.

ट्रेन एरेनिएल, कुलितुराई, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलिकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, थ्रिसूर, शोरानूर, तिरूर, कोझिकोडे, वडाचेर्‍यानूर, कानकुरनूर, कानूरोड, कानकुरन येथे थांबेल. मंगळुरु जं., सूरथकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, मुर्डेश्वर, कुमटा, कारवार, मडगाव जं., थिविम, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्टेशन पर्यंत [प्रवास करेल.

वरील गाड्यांच्या थांब्यांच्या वेळेच्या अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT