Goa Highways Speed Limit:
Goa Highways Speed Limit:  Dainik Gomantak
गोवा

Goa Highways Speed Limit: गोव्यातील महामार्गांवर वेगमर्यादा निश्चित्त होणार; 70 किमी प्रतितास टॉप स्पीड शक्य?

Akshay Nirmale

Goa Highways Speed Limit: गोव्यातील महामार्गांचे चौपदरीकरण आणि सहा पदरी करण्यासाठी 14000 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला असला तरीही 80 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालविण्याची वेगमर्यादा अद्याप नाही.

चांगल्या रस्त्यांमुळे प्रवास वेगाने व्हावा यासाठी वेगमर्यादा असते. तथापि, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला 80 किलोमीटर प्रतितास वेग मर्यादेला परवानगी देणे व्यवहार्य नाही, असे वाटते.

गोव्यातील महामार्गांच्या जाळ्याचा विस्तार 2016 पासून सुरू झाला आहे. तथापि, गावातील रस्ते महामार्गांशी जोडले गेले, तसेच सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी उपलब्ध जागा नसल्यामुळे हायवेवरील वाहनांची वेग मर्यादा वाढण्यास ब्रेक लागला आहे.

अटल सेतूवर वेगर्मयादा केवळ 50 किमी प्रतितास

सध्या, राज्यातील महामार्गांवरील वेगमर्यादा सतत बदलत असते. काही भागांमध्ये 500 मीटरच्या अंतरानेही वेग मर्यादा बदलते. बार्देश आणि तिसवाडीला जोडणाऱ्या अटल सेतूवर वेग मर्यादा फक्त 50 किलोमीटर प्रतितास इतकी आहे.

दरम्यान, PWD महामार्ग विस्तारीकरणात याबाबत सल्लागारांशी सल्लामसलत करत आहे. जेणेकरून रुंदीकरणानंतर काही मानकीकरण आणता येईल.

विस्तारित महामार्गावरील किमान वेग मर्यादा 80 किमी प्रतितास असावी तर एक्स्प्रेस वे वर वेगमर्यादा 120 किमी प्रतितास असावी, पण ती नियंत्रत हायवेजसाठी असावी, असे सरकारी अधिकारी सांगतात.

हे आहे कारण...

गोव्यातील अनेक महामार्ग वस्तीमधून जातात. शाळा, रुग्णालये, गावे आणि धार्मिक स्थळे महामार्गांवर आहेत. त्यामुळे वेगमर्यादा एकच ठेवणे अडचणीचे ठरते. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता गोव्यात 50 किलोमीटर प्रतितास सरासरी वेग आणि 70 किलोमीटर प्रतितास टॉप स्पीडला परवानगी दिली जाऊ शकते.

केवळ शिरदोणा येथील नियंत्रित सहापदरी उड्डाणपुलावर 80 किमी प्रतितास वेगाची परवानगी दिली जाऊ शकते. जर सर्व्हिस रोड्स तयार केले तरीही वेगमर्यादा वाढवता येईल. पण त्यासाठी जमीन उपलब्ध नाही.”

पीडब्ल्यूडीने वेग मर्यादेचे मानकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. असे कार्य 2018 मध्ये अखेरचे हाती घेण्यात आले होते. लवकरच गावातील रस्ते, जिल्हा रस्ते आणि राज्य महामार्गावरील वेग मर्यादा प्रमाणित करण्यात येणार आहे, असे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT