Goa Diwali 2023: राज्यपाल, मुख्यमंत्री, आर्चबिशप यांनी गोमंतकीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीची रोषणाई प्रभू रामाच्या उच्च आदर्शांची आठवण करून देते - मुख्यमंत्री सावंत
Pillai | Sawant | Ferrao
Pillai | Sawant | Ferrao Dainik Gomantak

Goa Diwali 2023: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांनी दिवाळीच्या आनंददायी प्रसंगी गोव्याच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की की, "दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात महत्वाचा सण आहे, जो धर्म, जात, पंथ यांचा विचार न करता मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो.

दिवाळी अंधकारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या आध्यात्मिक विजयाचे प्रतीक आहे."

राज्यपाल म्हणाले, “दिव्यांच्या या सुंदर उत्सवानिमित्त मी सर्व लोकांना विनंती करतो की, समाजातून वाईट गोष्टींचे उच्चाटन करावे आणि आपल्या देशाची शांतता, सांप्रदायिक सलोखा, सद्भावना, संयम आणि समृद्धी वाढविण्यासाठी कार्य करण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करावे. हेच या सणाचे सार आहे.”

Pillai | Sawant | Ferrao
Nilesh Cabral: गोव्यातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी पैसेच नाहीत! केंद्र सरकार मदत करेल असे वाटले होते...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की “दिवाळी हा सण लोकांना वाईटावर विजय मिळवून शांतता आणि जातीय सलोखा नांदेल असा समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो. या दिवशीची रोषणाई आपल्याला प्रभू रामाच्या उच्च आदर्शांची आठवण करून देते.

14 वर्षांचा वनवास आणि रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवल्यानंतर प्रभू राम या दिवशी अयोध्येत परतले होते. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणे, हीच दिवाळी साजरी करण्यामागची प्रेरणा आहे.

हा सण प्रत्येक घराला आनंद आणि समृद्धीने उजळून टाको आणि दिवाळीचे दिव्य तेज, शांती, आनंद आणि चांगले आरोग्य सर्वत्र पसरू देत."

आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांनी म्हटले आहे की, "दिवाळी, दिव्यांचा सण. यानिमित्त मी आमच्या सर्व हिंदू बांधवांना त्यांच्या घरांमध्ये आणि समुदायांमध्ये आनंद, सुख यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.

Pillai | Sawant | Ferrao
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

वाईटावर विजय मिळविल्यानंतर या सणातून उजळणारा प्रकाश परोपकाराचा उबदारपणा आणतो. सुसंवाद आणि शांतता निर्माण करतो. हा सण आपल्याला हाच प्रकाश भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देईल.

जेणेकरून आपला समाज प्रेम, सत्य, समरसता आणि स्वातंत्र्याने उजळून निघेल.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com