Goa | Ropeway  Dainik Gomantak
गोवा

Panaji-Reis Magos RopeWay: पणजी ते रेईस मागूश किल्ला रोप वे प्रकल्पाच्या एनजीपीडीए प्रस्तावाला खंडपीठाची परवानगी

गोवा बचाव अभियान तसेच गोवा फाऊंडेशनने दाखल केली होती जनहित याचिका

Akshay Nirmale

Panaji-Reis Magos RopeWay: गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या पणजी ते रेईश मागूस या मांडवी नदीवरील ‘रोप वे’ प्रकल्प प्रस्तावाला परवानगी देण्यासाठी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) जनहित याचिकेत केलेल्या विनंतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तो कायद्यानुसार करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र या बाह्यविकास आराखडा 2021 नुसार प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्यास ती याचिकेतील अंतिम निर्णयावर अवलंबून असेल असे खंडपीठाने दिलेल्या आदेशात एनजीपीडीएला स्पष्ट केले आहे.

गोवा बचाव अभियान तसेच गोवा फाऊंडेशनने पणजी बाह्यविकास आराखडा (ओआडीपी) 2021 ला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या आराखड्यात अनेक ठिकाणी शेतजमिनींचे बिगर शेती दाखवण्यात आले आहे. सीआरझेड क्षेत्रातही अनेक त्रुटी असल्याचे मुद्दे याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.

खंडपीठाने या याचिकेत या आराखड्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या रोपे वे प्रकल्पाला काही पणजी नागरिकांनी विरोध केला होता. कायदेशीरपणे या प्रकल्पांना मंजुरी देण्यास मुभा ठेवली आहे. त्यामुळे ओडीपी 2021 खालील प्रकल्प एनजीपीडीए मंजूर करू शकणार आहे. ओडीपी 2021 नुसार एनजीपीडीने प्रकल्पांना मंजुरी दिल्यास त्याला नव्या याचिकेद्वारे आव्हान देण्यास खंडपीठाने याचिकादारांना मुभा ठेवली आहे.

या प्रकल्पाना दिलेली परवानगी ही खंडपीठात प्रलंबित असलेल्या जनहित याचिकेतील निवाड्याला बंधनकारक असतील व प्रकल्पाचे काम थांबवावे लागेल. त्यावर करण्यात आलेला खर्चाच्या भरपाईसाठी दावा करता येणार नाही यासंदर्भात सरकार तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्याला सहमती दिली आहे असे गोवा खंडपीठाने एनजीपीडीने या रोप वे प्रकल्पासाठीच्या परवानगीसाठी केलेल्या अर्जावरील आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT