Goa High Court Dainik Gomantak
गोवा

'पार्टनर'च्या आजारपणामुळे हवा व्हिसा, रशियन महिलेच्या अर्जावर निर्णय घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

Goa High Court: भारतीय नागरिकासोबत ‘लिव्ह-इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या रशियन महिलेच्या व्हिसाबाबत गोवा खंडपीठाने तिला मोठा दिलासा देणारे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भारतीय नागरिकासोबत ‘लिव्ह-इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या रशियन महिलेच्या व्हिसाबाबत गोवा खंडपीठाने तिला मोठा दिलासा देणारे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. महिलेने योग्य कारणांसह सादर केलेला नवा व्हिसा अर्ज तातडीने विचारात घेऊन कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

महिलेचा जोडीदार आजारी असून त्याच्या देखभालीसाठी गोव्यात राहणे आवश्यक असल्याचा दावा या रशियन महिलेने याचिकेत केला होता.

मात्र, व्हिसा नियमावलीत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ ही स्वतंत्र पात्र श्रेणी नसल्याचे कारण देत प्रशासनाने तिचा व्हिसा वाढवण्यास नकार दिला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती सुमन श्याम यांच्या खंडपीठासमोर झाली असताना त्यांनी यासंबधीचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, ही महिला सध्या व्यावसायिक व्हिसावर भारतात असून, तिला देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया सध्या तरी सुरू नसल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे न्यायालयात देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT