Goa Police Recruitment: उपनिरीक्षक पदांसाठीची अंतिम सीबीटी 25 रोजी, परीक्षेसाठी दोन्ही जिल्‍ह्यांतील केंद्रेही निश्‍चित

Goa PSI CBT exam Date 25 Jan 2026: कर्मचारी भरती आयोगाकडून १८७ पोलिस उपनिरीक्षकांची पदे भरण्‍यासाठीची अंतिम सीबीटी परीक्षा येत्‍या २५ जानेवारी रोजी घेण्‍यात येणार आहे.
Goa Police Recruitment
Goa Police RecruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कर्मचारी भरती आयोगाकडून १८७ पोलिस उपनिरीक्षकांची पदे भरण्‍यासाठीची अंतिम सीबीटी परीक्षा येत्‍या २५ जानेवारी रोजी घेण्‍यात येणार आहे. आयोगाने या परीक्षेसाठी उत्तर आणि दक्षिण गोव्‍यात केंद्रेही निश्‍चित केलेली आहेत.

उत्तर गोव्‍यात आसगाव येथील आग्‍नेल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड डिझाईन, आग्‍नेल टेक्‍निशियन एज्‍युकेशन कॉम्‍प्‍लेक्‍समध्‍ये, तर दक्षिण गोव्‍यात नावेली येथील रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टमध्‍ये परीक्षा होणार आहे.

Goa Police Recruitment
Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

पोलिस खात्‍यातील १८७ उपनिरीक्षकांची पदे भरण्‍यासाठीसंदर्भातील जाहिरात कर्मचारी भरती आयोगाने २ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी ५,२०० जणांनी अर्ज केलेले होते. यासाठीची पहिली सीबीटी आणि शारीरिक चाचणी झालेली आहे. त्‍यानंतर आता आयोगाने अंतिम सीबीटी २५ जानेवारीला घेण्‍याचे निश्‍चित केले आहे.

Goa Police Recruitment
South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

दरम्‍यान, पोलिस खात्‍यातील रिक्त १०,७८२ पदे भरण्‍यासाठी सरकारने मंजुरी दिलेली होती. त्‍यापैकी ९,७८२ पदे याआधी भरण्‍यात आलेली असून, उर्वरित पदे कर्मचारी आयोगामार्फत भरण्‍यात येत आहेत.

सद्यस्‍थितीत खात्‍यात ३६९ उपनिरीक्षक असून, त्‍यात महिला उपनिरीक्षकांची संख्‍या ६९ इतकी आहे. पुढील काळात उपनिरीक्षकांची आणखी २१५ पदे भरण्‍याचा निर्णय सरकारने घेतलेला असून, त्‍यातील १८७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com