Bombay High Court Goa Portuguese passport ruling Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीज पासपोर्ट असला तरी मालमत्तेवर गदा नाही, ज्येष्ठ नागरिकावरील 'एफआयआर' रद्द

Bombay High Court Goa Portuguese passport ruling: न्यायालयाने वास्को पोलीस स्थानकात एका ५३ वर्षीय वरिष्ठ महिला नागरिक आणि ओसीआय कार्डधारकाविरुद्ध नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पोर्तुगीज पासपोर्ट धारण केल्यामुळे मालमत्ता फेरफार प्रक्रियेत फसवणूक किंवा बनावटगिरीचा गुन्हा घडत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. या निकालासह न्यायालयाने वास्को पोलीस स्थानकात एका ५३ वर्षीय वरिष्ठ महिला नागरिक आणि ओसीआय कार्डधारकाविरुद्ध नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे.

याचिकाकर्त्या एलिझाबेथ फ्लोरा डायस यांच्याविरुद्ध रवी अँजेलो लुईस यांनी तक्रार दाखल केली होती. डायस यांनी पोर्तुगीज पासपोर्ट असतानाही स्वतःला भारतीय नागरिक असल्याचे सांगून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि मुरगाव मामलेदारांची फसवणूक केली, असा आरोप तक्रारदाराने केला होता.

वास्को शहरातील सर्व्हे क्र. १३७ आणि १३८ मधील मालमत्तेच्या फेरफार प्रक्रियेदरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा के ला होता. जुलै २०२५ मध्ये गुन्हे नोंदवण्यात आले होते.

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करताना स्पष्ट केले की, सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे पाहता यात बनावटगिरी किंवा फसवणुकीचा कोणताही घटक दिसून येत नाही. ओसीआय कार्डधारक गोव्यात निवासी मालमत्ता खरेदी करू शकतात, हे सरकारी पक्षानेही मान्य केले.

जरी सर्व आरोप खरे मानले, तरी यामुळे सरकारचे किंवा तक्रारदाराचे कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर नुकसान झालेले नाही. मालमत्तेच्या वादातून आणि वैयक्तिक शत्रुत्वातून ही तक्रार केल्याचे दिसून येत असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवणे हा ‘कायद्याचा दुरुपयोग’ ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grab Case : जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड रोहन हरमलकरला दणका! हायकोर्टाने फेटाळला जामीन; 212 कोटींची मालमत्ता जप्त

Goa Crime: नराधम कार क्लिनरची 10 वर्षांची सक्तमजुरी कायम! उच्च न्यायालयाचा पीडितेच्या बाजूने मोठा कौल; आरोपीची फेटाळली याचिका

IPL 2026 Points Table: "राजस्थाननं रोखला पंजाबचा विजयरथ!" गुणतालिकेत 'टॉप-3' मध्ये रॉयल एन्ट्री; हैदराबादची पीछेहाट

Vipreet Rajyoga 2026: "आता गरिबी हटणार अन् लक्झरी लाईफ मिळणार!" शुक्राचा 14 मे पर्यंत मोठा धमाका; विपरीत राजयोगाने उजळणार 'या' 4 राशींचे नशीब

Goa Traffic Police Office : वाहतूक कक्षात अखेर लागले दिवे, लोबोंची मध्यस्थी; थकीत बिलामुळे कळंगुट कक्ष चार-पाच दिवस अंधारात

SCROLL FOR NEXT