Goa Land Grab Case : जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड रोहन हरमलकरला दणका! हायकोर्टाने फेटाळला जामीन; 212 कोटींची मालमत्ता जप्त

Rohan Harmalkar Bail Rejection : राज्यातील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या जमीन बळकाव प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग गुन्ह्यात अडकलेला सामाजिक कार्यकर्ता रोहन हरमलकर (वय ३५) याला गोवा खंडपीठाने दणका दिला आहे.
Goa High Court denies bail in land scam case
Goa High Court denies bail in land scam caseDiniak Gomntak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या जमीन बळकाव प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग गुन्ह्यात अडकलेला सामाजिक कार्यकर्ता रोहन हरमलकर (वय ३५) याला गोवा खंडपीठाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी मंगळवारी हरमलकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

‘ईडी’ ने ३ जून २०२५ रोजी हरमलकरला अटक केली होती. म्हापसा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दोन मुख्य गुन्ह्यांच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, तोतयागिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, हरमलकर हा जमीन घोटाळ्यातील एका मोठ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, या टोळीने गोव्यातील मोक्याच्या जागा शोधून बनावट वारसा हक्क प्रमाणपत्रे, विक्रीपत्रे आणि मृत्युपत्रे तयार केली. तपासात सुमारे २२० कोटी रुपयांची गुन्हेगारी कमाई उघडकीस आली असून, त्यापैकी २१२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

Goa High Court denies bail in land scam case
Goa Land Grab Case: दोघांचं निधन झालं, एकजण सेवेत परतला, तीन सरकारी अधिकारी अजूनही निलंबित; भूमाफियांच्या संगनमताने लाटली जमीन

राजकीय षडयंत्राचा दावा फेटाळला

हरमलकरने आपल्यावर राजकीय सूडबुद्धीतून कारवाई झाल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने तो अमान्य केला. खटला चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन ईडीने दिल्याने दीर्घ कोठडीचा मुद्दाही जामिनासाठी ग्राह्य धरला गेला नाही. सध्या रोहन हरमलकर कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Comunidade Land Grab Allegations
Goa Land Grab Scam
Bombay High Court Goa verdict
St Francis Xavier Controversial Remarks
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com