Goa Traffic Police Office : वाहतूक कक्षात अखेर लागले दिवे, लोबोंची मध्यस्थी; थकीत बिलामुळे कळंगुट कक्ष चार-पाच दिवस अंधारात

Calangute Panchayat Electricity Dispute: कळंगुट पंचायत आणि वाहतूक विभाग यांच्यात सुरू असलेला वीज बिलाचा वाद तात्पुरता मिटला आहे.
Goa Traffic Police Office
Calangute Panchayat Electricity DisputeDiniak Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कळंगुट पंचायत आणि वाहतूक विभाग यांच्यात सुरू असलेला वीज बिलाचा वाद तात्पुरता मिटला आहे. स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून अंधारात असलेल्या वाहतूक कक्षाचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. पंचायतीने मंगळवारी संबंधित कार्यालयाचा ‘एमसीबी’ सुरू करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला.

कळंगुट येथील फुटबॉल मैदानावरील इमारतीत वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात जागेच्या कमतरतेमुळे पंचायतीने ही जागा वाहतूक विभागाला उपलब्ध करून दिली होती. मात्र, २०१२ पासून वारंवार विनंती करूनही या कार्यालयाचे वीज बिल भरले गेले नव्हते. पंचायतीच्या म्हणण्यानुसार, ही थकबाकी ८ लाख १० हजार ५६७ रुपयांपर्यंत पोहोचली होती. अनेकदा नोटिसा बजावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पंचायतीने पाच दिवसांपूर्वी वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Goa Traffic Police Office
Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

“२०१२ पासून कळंगुट पंचायत वाहतूक विभागाचे वीज बिल भरत आहे. यावर एकूण खर्च १६ लाख रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. आम्ही विभागाला किमान निम्मी रक्कम भरण्याची विनंती केली होती; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वीज (एमसीबी) बंद करावी लागली. आता आमदारांनी मध्यस्थी करून थकबाकी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही वीजपुरवठा पुन्हा सुरू केला. आम्ही वाहतूक विभागाला सद्भावनेने ही जागा उपलब्ध करून दिली होती; यासाठी कोणताही विशेष करार केलेला नव्हता.”

Goa Traffic Police Office
Goa Transport: कंडक्टर धावला देवदूतासारखा! 'कदंब'मध्ये हरवले पाकीट, बस वाहकामुळे सापडले परत; प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक

मेणबत्तीच्या उजेडात काम

वीज नसल्यामुळे या कार्यालयातील सुमारे ३० कर्मचाऱ्यांना मेणबत्तीच्या उजेडात काम करावे लागत होते. संगणकीय प्रणाली बंद पडल्याने दंड भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्याचा फटका पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना बसत होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, कामकाज सुरू ठेवण्यासाठी काही संगणकीय उपकरणे इतर ठिकाणी हलवावी लागली.

सध्या उष्म्याचे दिवस असल्याने पंखा आणि एसीविना राहणे कठीण बनले आहे. त्यातत वीज नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.

आमदार लोबो यांनी मंगळवारी पुढाकार घेत पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. अधीक्षकांनी थकीत बिलाची फाईल तात्काळ मंजूर करून पंचायतीची देयके लवकरात लवकर भरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com