Goa High Court Dainik Gomantak
गोवा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa High Court FAR Dues: उदय च्यारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती वाल्मिकी मीनेझिस आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: हॉटेल व्यावसायिकांना बेकायदेशीररीत्या अतिरिक्त एफएआर आणि उंचीची परवानगी देऊनही त्यांच्याकडून ९० कोटी रुपयांपेक्षा अधिकची थकीत रक्कम वसूल न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नगरनियोजन विभागाला तीव्र शब्दांत फटकारले आहे. येत्या दोन आठवड्यांत या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास मुख्य नगरनियोजकांना न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे आदेश देत, खंडपीठाने भारी दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

उदय च्यारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती वाल्मिकी मीनेझिस आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्ते उदय च्यारी यांनी गोव्यातील व्यावसायिक प्रतिष्ठानांना, विशेषतः फोर-स्टार आणि फाइव्ह-स्टार हॉटेल्सना अतिरिक्त एफएआर आणि उंचीची मंजुरी देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

याचिकेत नमूद केल्यानुसार, राज्य सरकारच्या २२ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार, अतिरिक्त एफएआरसाठी प्रति चौरस मीटर २० हजार रुपये शुल्क आकारणे आणि मागणी पत्र (डिमांड नोट) जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत ते वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र, तत्कालीन मुख्य नगरनियोजक प्रतिवादी राजेश नाईक यांनी या प्रक्रियेचे उल्लंघन करून आणि कोणतेही शुल्क न आकारता या परवानग्या दिल्याचा आरोप आहे.

महालेखापाल (ऑडिट), गोवा यांच्या अहवालाचा हवाला देत याचिकाकर्त्याने स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त एफएआरचे शुल्क न आकारल्यामुळे राज्याच्या तिजोरीचे तब्बल १०७.३६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या एकूण रकमेपैकी नगरनियोजन विभागाने आतापर्यंत केवळ काही हिस्सा वसूल केला असून, विविध अर्जदारांकडून सुमारे ९० कोटी रुपये वसूल करणे अद्याप बाकी आहे.

उच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी वेळ मागितला. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ६ एप्रिल २०२६ आणि ८ जून २०२६ रोजी आदेश देऊनही सरकारने अद्याप उत्तर दाखल का केले नाही, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने मुख्य नगरनियोजकांना थेट नोटीस बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT