Supreme Court orders Arnab Goswami to appear before Mumbai High Court
Supreme Court orders Arnab Goswami to appear before Mumbai High Court 
गोवा

ELD मासेमारीवरुन न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले, कडक कारवाईचे आदेश

दैनिक गोमन्तक

भारतीय तटरक्षक दल जिल्हा कमांडर (Indian Coast Guard District Commander ) अवनिंदर सिंग नंदा यांनी 17 मासेमारी नौका एलईडी मासेमारी करत असल्याच्या आढळून आल्या आहेत. अशी माहिती न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने राज्य प्राधिकरणाने पुढील तारखेपर्यंत बंदीचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कारवाईचा अहवाल द्यावा असे म्हटले आहे.

(Goa high court ordered 5000 fine action on illegal LED fishing )

विभागीय खंडपीठ गोवा फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करत आहे, यावेळी एलईडी मासेमारी करत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड आणि उपकरणे जप्त केल्याशिवाय सोडल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने गोवा सरकारला सुनावले आहे. यावेळी न्यायालयाने नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना तुटपुंजा दंड देऊन सोडले जाऊ नये असे ही म्हटले आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे जिल्हा कमांडंट अवनिंदर सिंग नंदा यांनी माहिती दिल्यानंतर यावर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत मासेमारी बंदीचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कारवाईचा अहवाल सादर करा. विशेषतः ICG ला LED मासेमारी करताना आढळलेल्या 17 मासेमारी नौकांवर कारवाईचा अहवाल राज्य अधिकाऱ्यांनी द्यावा. आणि या 17 मासेमारी नौकांचा तपशील सादर करावा असे ही नमूद केले आहे.

गोवा सरकारच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्यास अधिकारी तयार नाहीत

गोवा फाउंडेशनने न्यायालयात माहिती देताना म्हटले आहे की, एलईडी मासेमारीवर बंदी घालण्याच्या गोवा सरकारच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्यास अधिकारी तयार नाहीत. तसेच मासेमारीच्या जहाजांमध्ये नेहमी जनरेटर असतात ज्याचा वापर LED आणि इतर कृत्रिम प्रकाशासाठी केला जातो. त्यामुळे अशा जहाजांवर कारवाई करणे आवश्यकआहे असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT