Rohan Khaunte: ...अन्यथा गोव्यातील पर्यटक कर्नाटक, महाराष्ट्रकडे वळतील

पर्यटन व्यवसायातील दलालांचे बस्तान उठवणे आवश्यक
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak 

गेले काही दिवस गोव्यातील पर्यटन क्षेत्रात अनावश्यक अशा प्रकारे दलालांनी आपले बसस्थान बसवलेले आहे. ज्याचा परिणाम भविष्यात राज्यातील पर्यटनावर होऊ शकतो अशी भीती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.

(Minister Rohan Khaunte said tourists will move to other states if goa doesnt keep up )

याबाबत बोलताना मंत्री खंवटे म्हणाले की, पाण्यातील खेळ असतील प्रस्तावित राज्यातील जेट्टी धोरण असेल या धोरणांवर विचार करून गोवा राज्याने योग्य दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये होत असलेला पर्यटन स्थळांचा विकास गोवा राज्यातील पर्यटकांना आपल्याकडे वळवून घेऊ शकतो असे ते म्हणाले.

आता समुद्रकिनारा असलेले प्रत्येक राज्य आपले समुद्रकिनारे विकसित करत आहे आणि पर्यटकांसाठी सेवा देत आहे, याचे उदाहरण देताना मालवणची प्रगती कशी होत आहे हे आपण पाहिले पाहिजे. दर्जेदार सेवेची मागणी करणारे आणि पाण्यातील खेळांचा आनंद घेऊ इच्छिणारे पर्यटक यांच्यासाठी योग्य पर्यटनस्थळांना विकसीत करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य व्यवस्थापन नसल्यास शेजारील राज्यांच्या किनारी जिल्ह्यांमध्ये असे पर्यटक वळतील आणि गोवा मात्र आपल्या पर्यटकांना गमावेले अशी ही भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Rohan Khaunte
Goa Police: अखेर राज्यातील '10' पोलिस अधीक्षकांना कार्यभार!

ते म्हणाले की अलीकडेच,पर्यटन विभागाने प्रस्तावित जेट्टी धोरणाबाबत पाण्यातील खेळ ऑपरेटर्ससोबत बैठक घेतली तेव्हा त्यांनी तक्रार केली की, गोव्यातील हॉटेल्सचे दलाल मालवणमधील जलक्रीडा उपक्रमांसह पॅकेज देत असल्याची माहिती त्यांनी दिली असे ते म्हणाले. पर्यटक शेजारच्या राज्यांमध्ये गेल्यावर या संबंधितांना त्यांचा मूर्खपणा लक्षात येईल. मात्र तेव्हा वेळ गेलेली असेल असे ही ते म्हणाले.

Rohan Khaunte
Goa Taxi App: टॅक्सी व्यवसाय कॉर्पोरेटच्या घशात!

मंत्री खंवटे म्हणाले, मालवणबरोबरच कारवारचाही विकास केला जात आहे. केंद्रीय निधीच्या मदतीने समुद्रकिनारा असलेले प्रत्येक राज्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यटन हा प्रत्येक राज्याच्या अजेंड्यावर आहे जो पूर्वी नव्हता. छत्तीसगड आणि झारखंड सारखी राज्ये जी कोळसा खाणीसाठी ओळखली जातात, तेही पर्यटनाकडे वळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com