पणजी: चिंबल परिसरातील ७१ बेकायदेशीर बोअरवेल प्रकरणात अखेर कारवाईला वेग आला असून जलसंपदा खात्याने आतापर्यंत २७ बोअरवेल बंद केल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर विभागाला हालचाल करावी लागली असून उर्वरित सर्व बेकायदेशीर बोअरवेल्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कायम आहेत.
न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत खात्याने न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात २२ बोअरवेल बंद केल्याचे नमूद केले. मात्र त्यानंतर आणखी ५ बोअरवेल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत एकूण २७ बेकायदेशीर बोअरवेल्स बंद करण्यात आल्या आहेत.
मात्र ७१ पैकी केवळ २७ बोअरवेल्सवर कारवाई झाल्याने उर्वरित बोअरवेल्सचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे उरलेल्या सर्व बोअरवेल्सवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयाने सादर करण्यास सांगितले आहे.
चिंबलमधील भूजल उपशावरून निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. आता ६ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत उर्वरित बेकायदेशीर बोअरवेल्सवर कारवाई पूर्ण करण्याचे मोठे आव्हान खात्यासमोर उभे राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.