Goa Heritage Festival 2024 Goa Tourism Instagram Handle
गोवा

Goa Heritage Festival 2024: हेरिटेज फेस्टिव्हल! गोव्याच्या परंपरेशी समरस करणारा समृद्ध अनुभव Videos

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Heritage Festival 2024

गोवा सरकारच्या पर्यटन विभागातर्फे साळगाव फुटबॉल ग्राउंडवर आयोजित झालेल्या तीन दिवसीय 'गोवा हेरिटेज फेस्टिव्हल- 2024' चा आनंद घेण्यासाठी स्थानिक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. हा महोत्सव 24 मे ते 26 मे 2024 या कालावधीत यशस्वीरित्या पार पडला.

कलात्मक अभिव्यक्तींद्वारे उपस्थितांसमोर राज्याच्या परंपरेशी समरस करणारा समृद्ध अनुभव सादर करून, गोव्याचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करणे हा या महोत्सवाचा उद्देश होता.

'गोवा हेरिटेज फेस्टिव्हल'ने परंपरा आणि सर्जनशीलतेचे एक अदभूत मिश्रण यंदाच्या या कार्यक्रमात प्रस्तुत केले. कलाकारांच्या सादरीकरणातून आपल्या राज्याच्या चैतन्यपूर्णतेचे दर्शन प्रेक्षकांना घडत होते.

पारंपारिक नृत्यांच्या मोहक हालचालींपासून ते अस्सल पाककृतींच्या स्वादिष्ट स्वादांपर्यंत गोव्याच्या संस्कृतीचे कालातीत सौंदर्य या उत्सवात साजरे झाले..

उद्घाटनाच्या दिवशी स्काय हाय आणि प्युअर मॅजिक या प्रख्यात बँडने आकर्षक सादरीकरण केले. स्थानिक आणि पर्यटकांनी पारंपारिक फॅशन शो आणि लोककलावंत कांता गावडे आणि समूहाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्यांचा आनंद लुटला.

दुसरा दिवस गोव्याच्या प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांच्या लाइव्ह म्युझिकच्या रोमांचक सादरीकरणाने प्रेक्षकांना रोमांचित केले. लिन्क्स आणि टाईडल वेव्हच्या अद्भुत संगीताने समकालीन तसेच गोव्याच्या संगीत परंपरांचे मिश्रण सादर करून गर्दीला संमोहित केले.

तिसऱ्या दिवशी 'ट्वेन्टी फ़ोर के इंडिया', 'टूली युअर्स' आणि 'आर्चिज 'ने उपस्थितांना एक अविस्मरणीय संगीतमय अनुभव देऊन या महोत्सवाचा समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमात, उपस्थितांनी पारंपारिक नृत्य, मिमिक्री आणि विविध सांस्कृतिक ऊपक्रमांचा आनंद घेतला.

या महोत्सवात पुस्तकांचे स्टॉल्स, गोव्याचा कलात्मक वारसा प्रदर्शित करणारी फोटो गॅलरी तसेच साहित्यिक आणि दृश्यात्मक कलेचे प्रदर्शन देखील होते. पारंपारिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खाद्यप्रेमींनी विविध अस्सल गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT