Goa Heritage Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Heritage Festival 2023 : पारंपरिक व्यवसायातून स्वावलंबी व्हा !

श्रीपाद नाईक यांचे युवकांना आवाहन : साळगावात ‘गोवा वारसा महोत्सव’चे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Heritage Festival 2023 : तरुणांनी सरकारी नोकऱ्यांच्या मागे न लागता, स्वतःचा उद्योगधंदा सुरू करावा. यासाठी पारंपरिक व्यवसायावर भर देऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. राज्यातील पारंपरिक संस्कृतीचे जतन करून स्वतःचा उद्योग सुरु केल्यास आपली संस्कृती आणि परंपरा टिकेल, असेही ते म्हणाले.

‘गोवा वारसा महोत्सव 2023’चे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते साळगाव मैदानावर मोठ्या थाटात करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप ३० एप्रिल रोजी होईल.

यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिलायला लोबो, केदार नाईक व अ‍ॅड. कार्लुस फेरेरा तसेच पर्यटन सचिव संजीव आहुजा, पर्यटन संचालक सुनील अंचीपका , गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मणेरकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शाह उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक ढोलताशांच्या गजरात करण्यात आले.

या महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या संस्कृतीचे दर्शन, खाद्यपदार्थांचे प्रदर्शन घडवण्यात आले आहे. मान्यवरांकडून प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी कलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत आणि राज्य सरकार या योजनेचा यथायोग्यपणे लाभ घेत असल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी समाधान व्यक्त केले.

दरवर्षी गोव्यात लाखो पर्यटक दाखल होत असतात. असे असूनही प्रत्येकाने पारंपरिकतेचे जतन करण्याचे प्रयत्न करावे, असा कानमंत्र मंत्री नाईक यांनी दिला. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

पर्यटनाला चालना

महोत्सवात देशी-विदेशी पर्यटक येणार असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रात बरीच सुधारणा होत आहे याचे उदाहरण म्हणजे हा महोत्सव ,असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

‘कलारंग’तर्फे लोकनृत्य

गोवा वारसा महोत्सवात फोंड्याच्या कलारंग गटाने पारंपरिक गोमंतकीय लोकनृत्ये सादर केली यात नमन, देखणी, धुळपद, घोडमोडणी, तालगडी,, गोफ, मोरुलो आदींचा समावेश होता. बोलक्या ड़्रमचे सादरीकरण कार्लोस गोन्साल्विस यांनी केले.

त्यांच्या तालवाद्य सादरीकरणाने महोत्सवात अव्दितीय अशी भर पडली. त्याशिवाय गोमंतकीय वाद्यवृंद पर्पल रेन यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना सांगितीक सैर करता आली. या सादरीकरणांनी महोत्सवात चैतन्य निर्माण केले.

"वारसा महोत्सवातून राज्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. तसेच अशा प्रकाराच्या महोत्सवामुळे देश-विदेशातून चांगले पर्यटकही गोव्यात दाखल होतील,असा आपल्याला विश्वास आहे."

-रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT