Solar Water Pump for Goa Farmer: गोवा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात एकूण 200 सोलर वॉटर पंप बसवण्यात येणार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीकामात मदत होईल आणि विजेचीदेखील बचत होणार आहे.
याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे ग्रिडशी जोडलेले कृषी पंप आहेत त्यांना "सोलराइज" करण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे समजते, इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
केंद्र सरकारने गोव्यात 200 सौर पंप बसवण्यास मान्यता दिली असून सुमारे 170 शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सौर वीजेचा वापर सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त वीजेची निश्चित्त दराने विक्री केली जाणार असल्याचे समजते.
या वॉटर पंपाची किंमत सुमारे 4 कोटी रुपये असेल आणि ते पीएम-कुसुम योजनेअंतर्गत वितरित केले जातील.
राज्याने गोव्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर 1-10 HP क्षमतेचे हे सोलर फोटोव्होल्टेइक वॉटर पंप बसविण्यासाठी, तसेच त्याची चाचणी, वाहतूक, पुरवठा करण्यासाठी बोलीदारांना आमंत्रित केले आहे. यात ऑफ-ग्रीड प्रणालींसाठी 5 वर्षे आणि सौर पॅनेलसाठी10 वर्षे गॅरंटी असावी, अशी अट आहे.
सोलर वॉटर पंपिंग (SWP) सिस्टीममध्ये ऑनलाइन रिमोट मॉनिटरिंग मेकॅनिझम (RMM) आहे. कंत्राटदार या SWP च्या कामगिरीवर देखरेख ठेवू शकेल. कंत्राटदारांना शेतकऱ्यांची आणि त्यांच्या ठिकाणांची नावे देण्यासाठी गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमचे काम नव्वद दिवसांत पूर्ण होईल, याची जबाबदारी एजन्सीवर असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.