Sanquelim Municipal Council Election 2023 : साखळीत निवडणूक प्रचारात वाढती रंगत; भेटीगाठीवर भर

जाहीरनामा तयारीला वेग : उमेदवारांच्या घरोघरी फेऱ्या
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Council Election 2023 : साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप व ‘टुगेदर फॉर साखळी’ या दोन्ही पॅनेलनी आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केल्याने आता या निवडणूक प्रचाराला बराच जोर चढला आहे.

साखळी ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील नगरपालिका असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्हीही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराचे मोजकेच दिवस राहिल्याने जाहीरनामा करण्यावरही उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

Sankhlim Municipality Election 2023
Green Card : गोवा राज्यातील नागरिकांना लवकरच मिळणार ग्रीन कार्ड

या निवडणुकीत गेल्यावेळेचेच समीकरण याहीवेळी आहे. गेल्यावेळीही या निवडणुकीत भाजप पुरस्कृत गट व धर्मेश सगलानी यांच्या नेतृत्वाखाली ‘टुगेदर फॉर साखळी’ हे दोन्ही गट निवडणुकीत अधिकृतपणे उतरले होते. तीही निवडणूक या दोन्ही गटांमध्येच चुरशीची झाली होती. ‘टुगेदर फॉर साखळी’ने 13 पैकी दहा तर भाजप गटाचे 3 उमेदवार निवडून आले होते.

याहीवेळी पूर्वीचेच समीकरण असल्याने एकूण १० प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळणार आहेत. या १० प्रभागांसाठी एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. या ३१ पैकी २० उमेदवार हे दोन्ही पॅनेलचे आहेत.

तर ११ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या ११ पैकी प्रभाग १ मधील एक अपक्ष उमेदवार परंतु भाजपचे गितेश माडकर यांंनी भाजप पुरस्कृत यशवंत माडकरांना पाठिंबा दिला आहे. तर अन्य एक भाजप समर्थक उमेदवारावर माडकर यांना पाठिंबा द्यावा,यासाठी दबाव आहे.

Sankhlim Municipality Election 2023
Goa Casino : परवाना शुल्काची 75 टक्के रक्कम भरा; सर्वोच्च न्यायालयाचा कॅसिनोंना दणका

संध्याकाळीच प्रचाराला प्राधान्य

सध्या या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. सर्व उमेदवार घरोघरी प्रचारावर भर देत आहे. वैयक्तिक मतदारांच्या भेटी घेऊन मतांची मागणी करत आहेत.

दिवसभर कडक ऊन व उकाडा असल्याने विशेषतः सर्व उमेदवार संध्याकाळी 5 वा. नंतर प्रचार करायला प्राधान्य देत आहेत. काही उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन तर काही उमेदवार मोजक्याच समर्थकांना घेऊन गुपचूपपणे प्रचार करीत आहेत.

भाजपसमोर स्वकियांचेच आव्हान !

बहुतांश प्रभागांमध्ये बहुतेक भाजप विरूद्ध ‘टुगेदर फॉर साखळी’ अशीच लढत दृष्टीक्षेपात आहे. प्रभाग क्र. 1 प्रमाणेच प्रभाग क्र. 12 मध्येही भाजपसमोर स्वकीयांचेच अप्रत्यक्ष आव्हान दिसत आहे. या प्रभागात भाजप व टुगेदर चे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु भाजपचे विर्डीतील खंदे कार्यकर्ते मिलींद नाईक यांच्या पत्नी प्रज्वला नाईक या रिंगणात उतरल्या आहेत. ही लढतही बरीच रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com