Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोवेकर काळजी घ्या! जोरदार पाऊस, उंच लाटांची शक्यता; राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

Goa Weather: राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली असून बुधवारीही प्रतितास ४० ते ६० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस बरसण्याची शक्यता आहे. वेधशाळेने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली असून बुधवारीही प्रतितास ४० ते ६० किमी वाऱ्याच्या वेगाने पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ३.६ ते ४.२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राने व्यक्त केली आहे.

पावसाची तीव्रता आणि एकंदरीत स्थिती पाहता गोवा वेधशाळेने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील २४ तासांत सरासरी २.४० इंच पावसाची नोंद केली असून आतापर्यंत राज्यात सरासरी ६७.१० इंच पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक ९४.१३ इंच पावसाची नोंद धारबांदोडा, तर सांगे येथे ९०.७४ इंच पाऊस नोंदविला गेला आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ४ इंच पावसाची नोंद म्हापसा येथे करण्यात आली.

त्याखालोखाल सांगे येथे ३ इंच, पणजी २.८५ पेडणे २.७७ इंच, जुने गोवे २.४४ इंच, केपे २.३६ इंच, दाबोळी २.२९ इंच, साखळी १.९८ इंच, धारबांदोडा १.८७ इंच, काणकोण १.७७ इंच, फोंडा १.५७ इंच, तर मुरगाव येथे १.४० आणि मडगाव येथे १.२२ इंच पावसाची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT