Sattari Heavy Rain Damage Dainik Gomantak
गोवा

घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, 12 हून अधिक ठिकाणी पडझड; सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा! 25 लाखांहून अधिक नुकसान

Sattari Heavy Rain Damage: सत्तरी तालुक्यात शनिवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने मोठी पडझड घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात शनिवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने मोठी पडझड घडली. तालुक्यात बाराहून अधिक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने घरे, रस्ते, वीजवाहिन्या आणि इतर मालमत्तेचे २५ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. दाबे-सत्तरी येथील गुरुदास म्हाळशेकर यांच्या घरावर आंबा व फणसाची मोठी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. भिंती, छप्पर आणि घराचा काही भाग उद्ध्वस्त झाला.

दिवसभर अग्निशमन दल, वीज खाते आणि आपत्कालीन यंत्रणा मदतकार्यात गुंतल्या होत्या. भर पावसात जवानांनी घरांवर, रस्त्यांवर आणि वीजवाहिन्यांवर पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.

ब्रह्मकरमळी, भुईपाल, दाबे, कोपार्डे-हेदोडे, पाडेली, म्हाऊस, आंबेडे-कुमळीची घाट, वाळपई आणि पालीसह अनेक भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी झाडे थेट वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वीज कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल हवामानातही काम केले.

बागायतींचीही हानी; वाहतूक कोंडी

वादळी वाऱ्यामुळे काही घरांची पत्रे व छप्परे उडून गेली असून बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आणि काही काळ वाहतूक कोंडी झाली.

नद्या-नाल्यांची पाणी पातळी वाढण्‍याची भीती

हवामानाचा जोर कायम राहिल्यास नद्या-नाल्यांची पाणीपातळी वाढून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मोठ्या झाडांखाली किंवा जीर्ण इमारतीजवळ थांबू नये, असे आवाहन केले आहे. अग्निशमन अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गावस व सहकाऱ्यांनी तीन वाहनांच्या मदतीने दिवसभर मदतकार्य केले.

कोठे झाली पडझड?

दाबे, शिवाजीनगर-खडकी, ब्रह्मकरमळी, भुईपाल, कोपार्डे-हेदोडे, पाडेली, म्हाऊस, आंबेडे-कुमळीची घाट, वाळपई, पाली व अन्य भाग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT