Goa Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

Goa Rain Alert: राजधानी पणजीसह बांबोळी, सत्तरी, डिचोली आदी भागांमध्‍ये पडझडीच्‍या घटना घडल्‍या. काही भागांत नद्यांना पूर येऊन पाणी रस्‍त्‍यांवर आले. त्‍यामुळे रस्‍ते पाण्‍याखाली जाऊन वाहतूक मंदावली.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या काही दिवसांपासून राज्‍यात कोसळत असलेल्‍या पावसाने मंगळवारी आणखी जोर धरला. त्‍यामुळे राजधानी पणजीसह बांबोळी, सत्तरी, डिचोली आदी भागांमध्‍ये पडझडीच्‍या घटना घडल्‍या. काही भागांत नद्यांना पूर येऊन पाणी रस्‍त्‍यांवर आले. त्‍यामुळे रस्‍ते पाण्‍याखाली जाऊन वाहतूक मंदावली. दरम्‍यान, पुढील चार दिवस अधूनमधून पावसाच्‍या जोरदार सरी बरसण्‍याची शक्‍यता व्‍यक्त करून गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र, कर्नाटक, गुजरातसह गोव्‍यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्‍यक्त करून हवामान विभागाने तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. त्‍यानुसार गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरूच होती.

आजपासून चार दिवस ‘यलो अलर्ट’

१.तिलारी नदीची पातळी धोकादायक; सतर्कतेचा इशारा

२.पणजीतील उद्योग भवन इमारतीचा सज्जा कोसळला

३.दूधसागर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

४.पेडे इनडोअर स्टेडियमचे सिलिंग कोसळले

५.बांबोळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी

६.पणजीतील अष्टमीच्या फेरीतील विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फटका

तरीही सरासरी ३.३ टक्‍के तूट

गेल्‍या २४ तासांत राज्‍यात सुमारे ३.५ इंच पाऊस पडला. यंदाच्‍या मान्‍सून हंगामात १ जून ते १९ ऑगस्‍टच्‍या सकाळपर्यंत ९४.७९ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या काळात सरासरी ९८.०५ इंच पाऊस पडतो. त्‍यामुळे यंदा आतापर्यंतच्‍या पावसात सरासरी ३.३ टक्‍के इतकी तूट आहे.

आतापर्यंतचा पाऊस (इंच)

म्‍हापसा ८१.७

पेडणे ८९.५८

पणजी ७८.६२

जुने गोवे ८९.६४

साखळी ९६.९४

वाळपई १२०.८३

फोंडा १००.५५

धारबांदोडा १२६.२२

काणकोण ९१.६६

दाबोळी ६७.२९

मडगाव ७९.३१

मुरगाव ६४.४२

केपे ११५.३६

सांगे १२४.०९

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT