
Goa Monsoon Advisory: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोवेकरांना थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाने थौमान घालण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने (IMD) मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला.
या अलर्टनुसार, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उंच लाटांमुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. ऑरेंज अलर्टचा अर्थ असा होतो की, हवामानाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि लोकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 19 ऑगस्ट व्यतिरिक्त, 20, 21 आणि 25 ऑगस्ट 2025 रोजीही हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. यलो अलर्ट म्हणजे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या पावसाचे कारण अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. या प्रणालीमुळेच राज्याच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस गोव्यासाठी आव्हानात्मक असण्याची चिन्हे आहेत.
या मुसळधार पावसामुळे गोव्यातील (Goa) जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पणजी, मडगाव, वास्को यांसारख्या शहरांमधील सखल भागांमध्ये पाणी साचू शकते, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडू शकतात.
तसेच, नदीकाठच्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना विशेषतः सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मांडवी आणि झुआरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, शेतीतही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उंच लाटांमुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपत्कालीन पथके, अग्निशमन दल आणि पोलिस विभाग यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास बचाव आणि मदत कार्य तातडीने सुरु करता यावे यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षही सक्रिय करण्यात आले आहेत.
पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनीही या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाहनचालकांनी विशेषतः काळजी घ्यावी, कारण रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ता आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड होऊ शकते. जुनी घरे आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एकंदरीत, गोव्यातील हवामानाचा अंदाज पाहता पुढील काही दिवस पावसाचेच राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी सतर्क राहणे आणि हवामान विभागाच्या तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाचे संकट आले तरी, सर्वांनी मिळून या परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन प्रशासन करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.