Goa Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Heavy Rain: वादळी वाऱ्यामुळे राज्याच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित, जनजीवन विस्कळीत; 3 दिवसांपासून पावसाचा वाढला जोर

Goa Strong Winds: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राज्याच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राज्याच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. बुधवारी अग्निशमन दलाच्या कार्यालयात मदतीसाठी सतत फोन येत होते. काही ठिकाणी पडझडीमुळे वाहनांचे तसेच घरांचे नुकसानही झाले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फातोर्डा येथे संरक्षक भिंतीवर मोठे झाड उन्मळून पडले. याशिवाय सेर्नाभाटी येथे माड रस्त्यासह वीजतारांवर पडला होता. सुदैवाने यात मोठे नुकसान झाले नाही. मडगाव अग्निशामक दलाने गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या आपत्कालीन कॉल्सना प्रतिसाद दिला. यात एका आत्महत्येच्या प्रयत्नाचा कॉलही होता.

कोलमोरोड, नावेली येथील मेलिंटन एन्क्लेव्ह येथे समीर शेख (४९) या इसमाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांकडून पहाटे अग्निशामक दलाला देण्यात आली. त्वरित दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे कोणीही जखमी सापडले नाही. अन्य एका घटनेत फातोर्डा येथील स्विमिंग पूलजवळ स्टीलच्या कुंपणावर झाड उन्मळून पडले. जवानांनी झाड तोडून बाजूला करत पन्नास हजार रुपयांची मालमत्ता वाचवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT