Goa Heatwave Dainik Gomantak
गोवा

Goa Heatwave: उकाड्याने नागरिक हैराण; जलस्रोतांवर वाढली वर्दळ, 'धोंड तळी' बनली आकर्षणाचे केंद्र

Goa Summer News: उष्णतेचा पारा चढल्याने उकाडा असह्य होत असून, अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत थंडगार पाण्याचा गारवा अनुभवण्यासाठी नागरिकांचा ओढा जलस्रोतांकडे वाढत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: उष्णतेचा पारा चढल्याने उकाडा असह्य होत असून, अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत थंडगार पाण्याचा गारवा अनुभवण्यासाठी नागरिकांचा ओढा जलस्रोतांकडे वाढत आहे. डिचोली तालुक्यातील विविध भागांतील नदी, तलाव व बंधाऱ्यांवर सध्या आंघोळीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शिरगाव येथील ‘धोंड तळी’ हे सध्या विशेष आकर्षण ठरत असून, येथे लहान मुलांसह युवकांचा मोठा जमाव दिसून येत आहे. रविवारी तर या तळीवर आंघोळीसाठी विशेष गर्दी झाली होती.

जत्रेपूर्वी काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव येथे आंघोळीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, जत्रेनंतर ही तळी पुन्हा खुली करण्यात आल्यानंतर नागरिकांनी येथे गर्दी केली आहे.

गावातील तसेच परिसरातील मुले या तळीत डुबक्या मारत आंघोळीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. ‘धोंड तळी’च्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याची स्थानिकांची धारणा असून, तळी सुरक्षित असल्यामुळे अनेकजण येथे येण्यास प्राधान्य देतात.

वाठादेव बंधाऱ्यावर आंघोळीस बंदी

डिचोली तालुक्यातील साखळी, कुडचिरे आदी ग्रामीण भागात जलस्रोत खात्याने उभारलेले काही बंधारेही आंघोळीसाठी आकर्षण ठरत आहेत. मात्र, कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील वाठादेव बंधाऱ्यावर सुरक्षेच्या कारणास्तव आंघोळीस बंदी घालण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांत या बंधाऱ्यात चारजणांचा बुडून मृत्यू झाल्याने हा बंधारा जीवघेणा ठरला आहे. त्यामुळे तेथे बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT