Goa 11th Admission: अकरावीसाठी आजपासून प्रवेश, शिक्षण विभाग सज्ज; वाणिज्य, विज्ञान शाखेत चुरस अपेक्षित

Goa Class 11 Admissions 2026: दहावीचा निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे.
Goa 11th Admission
Goa 11th AdmissionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दहावीचा निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. राज्यभरातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सोमवारपासून अकरावीच्या प्रवेशास प्रारंभ होणार आहे.

यंदाही शहरी भागांतील सुमारे १५ उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले की, राज्यात एकूण ११० उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये तीन प्रकारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यांपैकी शहरी भागातील सुमारे १५ विद्यालयांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

Goa 11th Admission
Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून आपले गुण, पसंतीची शाखा आणि विद्यालय निवडावे लागेल. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. इतर बहुतांश विद्यालयांमध्ये मात्र नियमित ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शहरांतील नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ऑनलाईन अर्जांची संख्या मोठी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा दहावीचा निकाल ९४.५१ टक्के लागला असून, एकूण २०,६१८ विद्यार्थ्यांपैकी १९,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. त्यामुळे आपल्या पसंतीच्या शाखा आणि नामांकित विद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी सोमवारपासून विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे. पुढील आठ दिवसांत विद्यार्थ्यांना अधिकृत गुणपत्रिका उपलब्ध होणार असल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले.

Goa 11th Admission
Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

१५ विद्यालयांमध्‍ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होईल. राज्यात एकूण ११० उच्च माध्यमिक विद्यालये असून सुमारे १५ विद्यालयांमध्‍ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सरकारी विद्यालयांमध्‍ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्‍वावर प्रवेश देण्‍यात येणार आहे. इतरत्र नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू असेल.

सध्या अकरावीच्‍या प्रवेशासाठी कला शाखेत सुमारे ५ हजार जागा उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेत ६ ते ६५०० जागा असून विज्ञान शाखेतही सुमारे ६ हजार जागा आहेत. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व वाणिज्य शाखांसाठी चढाओढ दिसून येईल.

- भगीरथ शेट्ये,

अध्यक्ष (गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Bengaluru delivery boy harassment case
Goa Fire Emergency Services
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com