Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: ..चुभती जलती गर्मी का मौसम आया! गोमंतकीय हैराण; एप्रिलच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर

Goa Temperature Update: एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान थेट ३५.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे चित्र एप्रिलच्या सुरुवातीलाच स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान थेट ३५.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यासोबतच किमान तापमानही २६.६ अंशांवर नोंदवले गेले असून, दिवस-रात्र दोन्ही वेळच्या तापमानात वाढ झाल्याने वातावरण अधिकच दमट व उष्ण झाले आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

या पावसामुळे उकाड्यात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, मात्र तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यानच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT