Heart Attack Dainik Gomantak
गोवा

Heart Disease Goa: चिंताजनक! गोव्यात दररोज सापडताहेत हृदयरोगाचे 19 रुग्‍ण; सर्वाधिक संख्या 'या' भागामध्ये

Goa heart disease cases: हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाने ग्रस्‍त असलेल्‍या १८ हजार ३३१ रुग्‍णांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात (गोमेकॉ) उपचार घेतले.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात गेल्‍या अडीच वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांच्‍या रुग्‍णांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या काळात हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाने ग्रस्‍त असलेल्‍या १८ हजार ३३१ रुग्‍णांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात (गोमेकॉ) उपचार घेतले. यातून राज्‍यात दरदिवशी हृदयाशी संबंधित आजारांचे सरासरी १९ रुग्‍ण सापडत असल्‍याची माहिती मिळाली आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी विचारलेल्‍या लेखी प्रश्‍‍नाला आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिलेल्‍या उत्तरातून

सादर केलेल्‍या आकडेवारीतून गेल्‍या अडीच वर्षांत राज्‍यात हृदयाशी संबंधित आजारांच्‍या रुग्‍णांमध्‍ये वाढ झाल्‍याचे दिसून येते. या अडीच वर्षांमध्‍ये अशा प्रकारचे सर्वाधिक रुग्‍ण बार्देश तालुक्‍यात तर सर्वांत कमी रुग्‍ण सांगे तालुक्‍यात आढळले.

त्‍यात पुरुषांचे प्रमाण ७३.६८ तर महिलांचे प्रमाण २६.३२ टक्‍के आहे. शिवाय ६० ते ७९ वर्षे वयोगटातील सर्वाधिक नागरिक हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्‍त होत असल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले.

दरम्‍यान, हृदयाशी संबंधित आजारी रुग्‍णांवर तत्‍काळ उपचार करण्‍यासह अशा रुग्‍णांवर नियंत्रण आणण्‍यासाठी गोमेकॉने आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना केल्‍या आहेत. २०१३ मध्‍ये हृदयरोग विभागाची स्थापना करण्‍यात आली.

ऑक्टोबर २०२३ आणि एप्रिल २०२५ मध्ये या विभागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. या विभागात सध्या ८५ खाटा आणि आवश्यक ती सर्व उपकरणे उपलब्‍ध आहेत. हृदयरोग रुग्णांची काळजी घेण्‍यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये स्टेमी कार्यक्रम सुरू करण्‍यात आला. त्‍याचा रुग्‍णांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळत आहे, असेही मंत्री राणे यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

अडीच वर्षांत सापडलेले तालुकानिहाय रुग्‍ण

तालुका रुग्‍ण

बार्देश ३५१९

सासष्‍टी ३४१८

तिसवाडी ३१८५

मुरगाव २५६४

फोंडा २३४१

सत्तरी १२४०

तालुका रुग्‍ण

डिचोली ७३१

पेडणे ३१४

काणकोण ३८८

धारबांदोडा १९६

केपे २८३

सांगे १५२

हृदयाशी संबंधित आजारांचे रुग्‍ण

वर्ष हृदयविकाराचा झटका हृदयरोग

२०२३ ११४४ ५,०३७

२०२४ १५४९ ६,४७६

२०२५ (जुलैपर्यंत) ८०८ ३,०१७

एकूण ३,८०१ १४,५३०

वयोगटानुसार रुग्‍ण

वयोगट टक्‍के

२० वर्षांखालील ०

२१-३९ ६.८०

४०-५९ ४१.६७

६०-७९ ४६.२७

८० पेक्षा अधिक ५.२६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

SCROLL FOR NEXT