Goa Health Dainik Gomantak
गोवा

Goa Health: शस्त्रक्रिया करताना महिलेचा ‘कार्डियाक अरेस्ट’मुळे मृत्यू

मडगाव येथील ईएसआय इस्पितळात शस्त्रक्रिया करताना सुनयना सिमो देसाई (50) या महिलेला आलेला मृत्यू ‘कार्डियाक अरेस्ट’ मुळे असे तपासणी केल्यानंतर निष्पन्न झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Health: मडगाव येथील ईएसआय इस्पितळात शस्त्रक्रिया करताना सुनयना सिमो देसाई (50) या महिलेला आलेला मृत्यू ‘कार्डियाक अरेस्ट’ मुळे असे तपासणी केल्यानंतर निष्पन्न झाले आहे. असे जरी असले तरी उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या मंडळाने आपला निष्कर्ष राखून ठेवला असून त्या महिलेचा व्हीसेरा पुढील तपासणीसाठी राखून ठेवला आहे.

बुधवारी ही घटना घडली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ती महीला मृत पावल्याचा आरोप कुटुंबियांनी केल्यावर मडगाव पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यू असे नमूद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता.

काल डॉ. मधू घोडकिरेकर, डॉ. साईनाथ वायगणकर, डॉ. सियानो फर्नाडीस व डॉ. विराज नमशिकर यांच्या पथकाने हे श विच्छेदन केले.

त्यानंतर मृतदेह तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या महिलेस थायरोयड आणि ह्रदयाचाही त्रास होता, अशी माहिती वैद्यकीय मंडळाच्या समोर आली आहे.

बोटावर शस्त्रक्रिया

सदर महिलेच्या बोटाला सूज येऊन बोटाची संवेदना बोथट झाल्याने तिच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रिया करण्यासाठीं तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले असता तिचे तिथेच मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

SCROLL FOR NEXT