Goa Minister Vishwajit Rane Meet PM Narendra Modi
पणजी: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीने गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतेवर आधीपासूनच चर्चा सुरू होती आणि या भेटीमुळे त्या चर्चांना अधिक गती मिळाल्याचे मानले जात आहे.
विश्वजीत राणे हे गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असून त्यांचा मंत्रिमंडळ फेररचनेत मोलाचा वाटा असू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. गोव्यातील भाजपच्या अंतर्गत धोरणे आणि आगामी योजना यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही भेट केवळ सौजन्यभेट होती की आगामी राजकीय हालचालींचा भाग, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, गोव्याच्या राजकारणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
याबाबत राणे यांनी अत्यंत मर्यादित अशी माहिती एक्सवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला पंतप्रधान, माझे गुरू नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा सन्मान लाभला. एक नम्र भाजप कार्यकर्ता म्हणून, त्यांच्या परिवर्तनशील दृष्टिकोन आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठीच्या अखंड प्रयत्नांतून मला अपार प्रेरणा मिळते.
साध्या पार्श्वभूमीतून भारताच्या विकासकथेला नेतृत्व करणाऱ्या त्यांच्या प्रवासाने माझ्या हृदयाला खोलवर स्पर्श केला आहे. लोकांशी असलेले त्यांचे आत्मीय नाते आणि त्यांचे उबदार व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष अनुभवताना त्यांच्या नेतृत्वाविषयी असलेली माझी प्रशंसा अधिकच दृढ झाली
राष्ट्र प्रथम आणि विकसित भारत या त्यांच्या तत्त्वज्ञानाने केवळ धोरणांमध्ये बदल केला नाही, तर लाखो भारतीयांमध्ये नवचैतन्य, अभिमान आणि उद्देश निर्माण केला आहे. त्यांच्याशी झालेल्या या वैयक्तिक संवादाने पक्षासाठी आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत करण्याचा माझा निर्धार अधिक बळकट केला आहे, असे त्यांनी एक्सवर म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.