Goa GMC Issue Dainik Gomantak
गोवा

Goa GMC Issue: "तू मंत्र्यांचो चमचो" आंदोलक डॉक्टरांचा डीनविरोधात भडका; हमरीतुमरीमुळे CM सावंतही झाले अवाक!

Viswajit Rane Controversy: आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची आगपाखड व डॉक्टरांची आक्रमक भूमिका यांची तीव्र झळ डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि सुपरिटेंडंट डॉक्टरांना बसली आहे.

Sameer Amunekar

पणजी: आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांची आगपाखड व डॉक्टरांची आक्रमक भूमिका यांची तीव्र झळ डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि सुपरिटेंडंट डॉक्टरांना बसली आहे. आंदोलक डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. बांदेकर यांच्यावर तीव्र दोषारोप करून त्यांना तिखट शब्दांत सुनावले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉला भेट दिल्यानंतर ते आंदोलक डॉक्टरांच्या प्रमुखांना घेऊन डीनच्या कार्यालयात शिरले, तेव्हाच डॉक्टरांच्या नाराजीचा भडका उडाला. सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांसह दाखल झालेले मडगावच्या शवचिकित्सा विभागाचे डॉक्टर मधू घोडकिरेकर यांनी डीन बांदेकरांवर आरोपांची फैरी झाडली.

‘‘तू मंत्र्यांचो चमचो,’’ असा आरोप डॉ. घोडकिरेकर यांनी बांदेकरांवर केल्यामुळे सारेजण अवाक झाले व बांदेकर भावनिक बनले. यावेळी आधीच क्रूद्ध झालेल्या डॉक्टरांनीही तेथे गदारोळ केला व आरोपांमुळे एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शांत केले.

डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले, आंदोलक डॉक्टर आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉत प्रत्यक्ष येऊन आपदग्रस्त सीएमओ डॉ. रूद्रेश कुट्टीकर यांची माफी मागावी, अशी मागणी करू शकत नाहीत. डॉ. घोडकिरेकर यांचा असाही दावा होता, की आंदोलकांनी ही मागणी लेखी स्वरूपात डीनकडे केली असली तरी ती त्यांनी स्वीकारून वर पाठविणे पण चुकीचे होते.

डॉ. मधू घोडकिरेकर यांनी या तणावाच्या वातावरणात म्हटले, की आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचा विश्‍वास गमावला आहे. सरकारी डॉक्टर आणि त्यांच्या संघटना या वर्तणुकीबद्दल अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी हे खाते यापुढे आपण सांभाळणार का, याचा विचार करावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अत्यंत प्रगल्भपणे हे प्रकरण हाताळले. महत्त्वाचे म्हणजे, डीन यांच्या कार्यालयामध्ये ज्याप्रकारे गोंधळ झाला व परस्परविरोधी दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे डॉक्टरांमध्येच ऐक्य नसल्याचे उघडकीस आले.

यावेळी उपस्थित आंदोलक डॉक्टरांनीही मुख्यमंत्र्यांच्या देखत ज्या पद्धतीने गोमेकॉतील ज्येष्ठ पदधारक डॉक्टर मंत्र्यांपुढे लोळण घेतात, त्याचा समाचार घेतला. परंतु मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण आणखी तापणार नाही, याची खबरदारी घेतली.

मंगळवारी डॉक्टरांनी ज्याप्रकारे आंदोलन मागे घेतले व काही डॉक्टरांनी यावेळी पळपुटी भूमिका घेतली, त्याबद्दल समाज माध्यमांवर आज रोष व्यक्त झाला.

राणेंना कोणताही धोका नाही

भाजपच्या श्रेष्ठींनी गोमेकॉ प्रकरणाचा समग्र आढावा घेतला आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हे अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत आणि आरोग्य सेवेत त्यांनी आमूलाग्र बदल घडविले आहेत, याची जाणीव असल्याने त्यांच्या मागे सक्षमपणे राहण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

घटनाक्रम असा...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सकाळी ११ वा. गोमेकॉमध्ये जाऊन आंदोलकांना भेटतील, अशी अपेक्षा डॉक्टरांनी बाळगली होती; पण प्रत्यक्षात ते दुपारी तेथे पोहोचले. त्यांनी गोमेकॉत उपस्थित रहावे म्हणून डॉक्टरांकडूनच त्यांना सतत फोन जात होते. त्याआधी आरोग्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष माफी मागू नये, असे ठरले व मुख्यमंत्र्यांनी तेथे जाऊ नये, यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता.

डॉ. मधू घोडकिरेकर आंदोलक डॉक्टरांबरोबर तेथे कसे पोहोचले, याबद्दल अनेक डॉक्टरांनाही आश्‍चर्य वाटते. डॉ. घोडकिरेकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आज समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त झाली. या प्रकाराबद्दल डॉक्टरांनीही माफी मागितली पाहिजे, असा काहीसा पवित्रा त्यांनी घेतला, त्याची निंदा झाली व डॉक्टरांना आंदोलनापासून प्रवृत्त करण्याचे काम डॉ. घोडकिरेकर यांनी केले, असा त्यांच्यावर आरोप झाला.

डॉ. घोडकिरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डीन डॉ. बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.

डॉक्टर क्रूद्ध बनले आहेत व ते आरोग्यमंत्र्यांचा निषेध करीत आहेत, या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्यापेक्षा आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा विचार करावा, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांची भूमिका होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी प्रकरण आणखी तापू दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT