Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: राज्यात पुन्‍हा 'कॅश फॉर जॉब', सरकारी नोकरीचं आमिष दाखवत 18 लाख उकळले, सुहाना नाईक अटकेत

Suhana Sujay Naik Arrested: राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाची धग शांत होत असतानाच सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

Sameer Amunekar

फोंडा: राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाची धग शांत होत असतानाच सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आरोग्य खात्यात नोकरी देण्याचे आश्वासन देत १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारवाडा-आमोणे येथील सुहाना सुजय नाईक (३९) हिला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने सुहाना हिला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणामुळे राज्यातील ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहाना नाईक ही पूर्वी सरकारी खात्यात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होती. सरकारी कार्यालयांतील ओळखींचा फायदा घेत तिने उसगाव परिसरातील काही नागरिकांना आरोग्य खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर, वाहनचालक आणि कारकून अशा पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

नोकरी मिळणार या विश्वासावर तिघांनी तिला तब्बल १८ लाख रुपये दिल्‍याचे समोर आले आहे. मात्र पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी फोंडा पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुहाना नाईक हिला ताब्यात घेतले.

फोंडा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्‍यान, यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्‍या संशयित पुरुष आरोपींमध्ये सागर नाईक, अजित सतरकर, संदीप परब आणि योगेश कुंकळ्येकर यांचा समावेश आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप या सर्वांवर आहेत. सध्या हे सर्व जामिनावर असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

‘कॅश फॉर जॉब’ : सुहाना पाचवी महिला

राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये पूजा नाईक, दीपश्री गावस, श्रुती प्रभुगावकर आणि सुनीता पावसकर या महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले होते. दरम्‍यान, सुहाना आता पाचवी महिला ठरली आहे.

आरोग्य खात्यात नोकरीचे आमिष

या नव्या प्रकरणात संशयित सुहाना नाईक हिने विशेषतः आरोग्य खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. ती पूर्वी आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करत असल्याने तिची अनेकांशी ओळख झाली होती. त्याच ओळखींचा आधार घेत तिने संबंधितांना विश्वासात घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या तक्रारदारांची संख्या मर्यादित असली तरी आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुढच्‍यांना ठेच, मागचेही अतिशहाणे : सरकारी नोकरीसाठी लाखो रुपयेे उकळण्‍याचे हे प्रकरण गेल्‍या वर्षीचे म्‍हणजे २०२५ सालातील आहे. विशेष म्‍हणजे त्‍यापूर्वी २०२४ च्‍या उत्तरार्धात ‘कॅश फॉर जॉब’ हे प्रकरण उघडकीस आले होते. अनेक लोकांना ‘टोपी’ घालण्‍यात आली होती. तरीसुद्धा लोक ‘जागे’ झाले नाहीत. सुहाना नाईक हिने लोकांना गंडवलेच आणि लोकही त्‍यास बळी पडले.

जे काही प्रकार उघडकीस आले आहेत, ते तर केवळ हिमनगाचे टोक आहेत. निःपक्षपाती चौकशी झाल्यास, हा भ्रष्टाचार किती खोलवर पसरला आहे, हे स्पष्ट होईल.

- विजय सरदेसाई, आमदार (गोवा फॉरवर्ड)

या प्रकरणाची पोलिसांना पूर्ण कल्पना आहे, पण सत्य काही बाहेर येणार नाही, हेही तेवढेच खरे. या प्रकरणांची चौकशी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे.

- ॲड. अमित पालेकर, (काँग्रेस नेते)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT